Agriculture News in Marathi, Farmers demand debt waiver, remunerative crop prices, agitation, delhi | Agrowon

शेतमालास योग्य हमीभाव; संपूर्ण कर्जमाफी : दिल्ली दणाणली
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींनुसार शेतमालास किफायतशीर दर अाणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत देशातील २० राज्यांतील १८४ शेतकरी संघटनांनी सोमवारी (ता. २०) दिल्लीत धडक दिली.
 
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात अाले. रामलीला मैदान ते संसद मार्गापर्यंत शेतकऱ्यांनी अांदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले. या अांदोलनादरम्यान किसान मुक्ती संसद घेण्यात अाली.
 
नवी दिल्ली ः स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींनुसार शेतमालास किफायतशीर दर अाणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत देशातील २० राज्यांतील १८४ शेतकरी संघटनांनी सोमवारी (ता. २०) दिल्लीत धडक दिली.
 
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात अाले. रामलीला मैदान ते संसद मार्गापर्यंत शेतकऱ्यांनी अांदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले. या अांदोलनादरम्यान किसान मुक्ती संसद घेण्यात अाली.
 
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अाणि खासदार राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक धावले, स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव, ॲड. प्रशांत भूषण, किसान सभेचे नेते अतुलकुमार अंजान, किसान मजदूर सभेचे अध्यक्ष बी. वेंकट रमय्या, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष कोडीहल्ली चंद्रशेखर, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम अादी या वेळी उपस्थित होते.
 
संपूर्ण कर्जमाफी अाणि सर्व शेतमालास किफायतशीर दर अादी प्रमुख दोन मागण्यांचे विधेयक किसान मुक्ती संसदेत एकमताने मंजूर करण्यात अाले. ही दोन खासगी विधेयके लोकसभेत खासदार राजू शेट्टी अाणि सीपीअायचे (एम) खासदार के. के. रागेश राज्यसभेत मांडणार अाहेत. ही दोन्ही विधेयके संसदेत मंजूर होण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतली जाईल, असे किसान सभेचे अध्यक्ष अशोक धावले यांनी सांगितले.
 
कोणतेही राज्य शेतमालाच्या किमान अाधारभूत किमतीपेक्षा अधिक बोनस देणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती; मात्र दुसरीकडे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राज्य सरकार कापसाला प्रतिगाठीमागे (एक गाठ १७० किलो) ५०० रुपये बोनस जाहीर करते. मग इतर राज्यांतील शेतकऱ्यांना बोनस का नाही, असा प्रश्न सीपीअायचे नेते अतुल अंजन यांनी केला. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक धावले म्हणाले, की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के ज्यादा नफा द्यावा, अशी अामची प्रमुख मागणी अाहे. 
 
`शेतकरीप्रश्नी सरकारकडून राजकारण'
कीटकनाशके, खते अादी कृषी निविष्ठांच्या किमती वाढत अाहेत; मात्र सरकारी अनुदान कमी केले जात अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अाणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांशी काहीही करत नाही. उलट शेतकरीप्रश्नी राजकारण केले जात अाहे, असा अारोप या वेळी शेतकरी संघटनांनी केला.
 
शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका
देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक शेतकरी यात सहभागी झाले होते. शेतकरी संघटनांनी दिल्लीत मोर्चा काढला. या वेळी मंदसोर (मध्य प्रदेश) येथील आंदोलनामध्ये गोळीबारात बळी पडलेल्या तसेच यवतमाळमध्ये कीटनाशक फवारणीवेळी विषबाधा होऊन प्राण गमवावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मौला यांनी कर्जमाफी देण्याची आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किमतीची हमी देण्याची तरतूद असलेल्या विधेयकाचा मसुदा सादर केला.
 
 

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...