agriculture news in marathi, farmers demand to government should rethinking on snf issue, pune, maharashtra | Agrowon

‘एसएनएफ’च्या जाचक निकषांचा शासनाने पुनर्विचार करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

राज्यातील शेतकऱ्यांकडून दर्जेदार दुधाचा पुरवठा होणे व त्यांना त्यांच्या कष्टाचे मूल्य मिळण्यासाठी सर्व दूध उद्योग प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही जण ‘एसएनएफ’चा मुद्दा पुढे करून गरज नसताना गोंधळ घालत आहेत. दूध धंद्याची अधोगती आपल्याला थांबवायची की नाही असा आमचा प्रश्न आहे. जनावरांना व्यवस्थित आहार दिल्यास कधीही ‘एसएनएफ’चा मुद्दा उपस्थित होत नाही. चांगला आहार द्या व चांगला भाव घ्या असा सरळ व्यवहार आता करायचा आहे. त्यामुळे ‘एसएनएफ’च्या मुद्द्याला आवास्तव महत्त्व देऊ नये.
- प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ.

पुणे   ः दुधासाठी सातत्याने आंदोलन केल्यानंतर मिळालेली पाच रुपयांची दरवाढ विविध नियमांच्या आडून काढून घेण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. ‘एसएनएफ’बाबत चुकीचे निकष लावण्यात आले असून, त्याचा पुनर्विचार शासनाने करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने दूध खरेदीसाठी ‘एसएनएफ’चे निकष जाहीर केले आहेत. ८.५ ‘एसएनएफ’च्या नावाखाली प्रतिपॉइंट २० पैसे कपात अपेक्षित असताना शासनाने एक रुपया कपातीला परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. एका पॉइंटसाठी एक रुपया कपात केली जात असल्याने व ८.५ ‘एसएनएफ’च्या पुढे केवळ काही पैसे दिले जात असल्यामुळे भेसळीला चालना मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कोडीतकर डेअरी फार्मचे दूध उत्पादक शेतकरी विनोद कोडीतकर म्हणाले, की ‘एसएनएफ’ जास्त लागण्यासाठी काही दूध उत्पादक जनावरांच्या आहाराची काळजी घेतात. मात्र, त्यांना ८.५ ‘एसएनएफ’च्या पुढे एक रुपया देण्यास शासन तयार नाही. प्रत्येक शेतकरी आहाराबाबत खर्च करू शकत नाही. त्यामुळे कमी ‘एसएनएफ’साठी थेट एक रुपया कपात केला जाणार आहे. २५ ते ५० पैसे कपात शेतकरी सहन करू शकतो. मात्र, एक रुपया कपातीचा निर्णय चुकीचा आहे.

अमरा गोसंवर्धन मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व दूध उत्पादक मंगेश काळभोर म्हणाले, की दुधाचे संकलन करणारे आपल्या पद्धतीने चांगले दूध खरेदी करतील. मात्र, ‘एसएनएफ’च्या जादा कपातीमुळे बाजारात भेसळीच्या मालाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरासरी ३.८ व ८.७ निकषाचा दूध पुरवठा होतो. पण, त्यांना त्या प्रमाणात भाव न देण्यात डेअरी उद्योगाला अडचणी आहेत.

मुळात मलई काढून पावडर टाकून फॅटचे प्रमाण ३.५ वर आणण्याकडे अनेकांचा कल असतो. डेअरीचालकांच्या फायद्यासाठी ‘एसएनएफ’चा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दर्जानुसार दूध पुरवठा करावाच लागेल; अन्यथा कपात तरी सहन करावी लागेल, असे श्री. काळभोर म्हणाले.

शंभू महादेव डेअरी प्रॉडक्टसचे संचालक दादा कुंजीर यांनी ‘एसएनएफ’बाबत कपात ३० पैशांपर्यंत ठेवणे योग्य होते, असे मत व्यक्त केले. थेट एक रुपया कपात केल्यामुळे दर वाढवून दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे. काही भागात ‘एसएनएफ’ चांगला मिळत नाही. त्यामुळे दिशाभूल करणारा निकष लावण्यात आला असून, त्यात योग्य ती सुधारणा शासनाने करावी, असे ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, की २५ रुपये दुधाचा दर होताच ‘एसएनएफ’ आाणि फॅटसचा मुद्दा शेतकऱ्यांच्या पिळवणुकीसाठी उकरून काढण्यात आलेला आहे. ‘एसएनएफ’बाबत यापूर्वी जागृती नव्हती. दर्जेदार दुधासाठी शेतकरी योग्य ती काळजी घेत आलेला आहे. मात्र, कसेही करून त्याला लुटायचेच ठरविले असल्यास ‘एसएनएफ’चा मुद्दादेखील हत्यार बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे."

या मुद्द्याच्या खोलात गेल्यास त्यातून भेसळीला आळा बसण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसू लागले आहे. दुधाला दर वाढवून मिळताच ‘एसएनएफ’च्या तक्रारी कशा काय सुरू झाल्या याचा विचार करावा. जादा फॅट आणि ‘एसएनएफ’ असलेले दूध यापूर्वी देणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील आता कमी ‘एसएनएफ’ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मस्तवाल झालेल्या दूध लॉबीसमोर शेतकरी हतबल झाला आहे. पण, आम्ही राज्यातील दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे अनिल पवार यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...