Agriculture News in Marathi, Farmers demand, moong and urad procurement centres, Sangli | Agrowon

मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी
अभिजित डाके
रविवार, 8 ऑक्टोबर 2017
तालुक्‍याच्या ठिकाणी मूग व उडीद खरेदी केंद्रे सुरू केली, तर शेतकऱ्यांची सोय होईल. तालुक्‍याच्या प्रत्येक बाजार समितीत केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. यामुळे हमीभावाने मूग व उडदाची विक्री करणे शक्‍य होईल. 
- योगेश जगदाळे, शेतकरी, वलखड, ता. खानापूर, जि. सांगली.
सांगली ः जिल्ह्यात मूग, उडीद या धान्यांची काढणी पूर्ण झाली आहेत. याची विक्री करण्यासाठी शेतकरी बाजार समितीचा आधार घेऊ लागले आहेत. मात्र, प्रत्येक तालुक्‍यातील बाजार समितीत अद्यापही मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. यामुळे खुल्या बाजारपेठेत आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागते आहे.
 
परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक तालुक्‍यातील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. 
 
शेतकऱ्यांच्या मूग, उडीद धान्याच्या राशी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खुल्या खासगी बाजारपेठांत हे धान्य कमी दराने विकावे लागत आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी करत आहेत. यामुळे दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. 
 
सध्या बाजारपेठेत ४ हजार ५०० रुपये मूग, तर ३ हजार ५०० रुपये दराने उडीद खरेदी सुरू आहे. शासनाकडून केवळ मुगासाठी ५ हजार ९२५ रुपये, तर उडीदसाठी ५ हजार ८०० हमीभाव जाहीर केलेले आहेत. 
 
सांगली बाजार समितीमध्ये उडीद, मूग खरेदी केंद्र सुरू केले जाते. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना उडीद व मूग विक्रीसाठी नेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. सांगली बाजार समितीत मूग, आणि उडदाचे नमुने घेऊन यावे लागत आहे, त्यानंतर विक्रीसाठी यावे लागते. तसेच विक्रीनंतर पुन्हा धनादेश घेण्यासाठी यावे लागते, सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. त्यात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
 
‘हमीभाव मिळाला तर अधिक पैसे हाती येतील'
सांगली जिल्ह्यात ज्या ठिकाणी बाजार समितीचे आवार आहेत; तिथे खरेदी केंद्र सुरू करणे आवश्‍यक आहे. तालुक्‍याच्या ठिकाणी खरेदीची कोणतीही यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धान्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कमी पावसाने उडीद आणि मुगाचे उत्पादन घटले आहे. यामुळे हमीभाव मिळाला तर अधिक पैसे हाती येतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
 
मात्र, विक्रीसाठी खरेदीच केंद्र नसल्याने करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांत उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच बाजारात शेतमाल आणल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांना कोंडीत पकडत आहेत, यामुळे दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...