agriculture news in marathi, Farmers demand MSP for Onion, Nashik, Maharahtra | Agrowon

कांद्यावरील निर्बंध हटवा; हमीभाव द्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नाशिक : मागील तीन वर्षांपासून आम्ही कांदा तोट्यात विकला आहे. आम्हाला आतातरी हक्काचा भाव मिळूद्या. कांद्यावर घातलेले निर्बंध हटवा. खर्च निघेल इतका तरी कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेकडो कांदा उत्पादकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

नाशिक : मागील तीन वर्षांपासून आम्ही कांदा तोट्यात विकला आहे. आम्हाला आतातरी हक्काचा भाव मिळूद्या. कांद्यावर घातलेले निर्बंध हटवा. खर्च निघेल इतका तरी कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेकडो कांदा उत्पादकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

बाजारात कांदा आवक कमी व मागणी जास्त अशी स्थिती झाली असताना कांद्याचे वधारत होते. मात्र शासकीय यंत्रणा हे दर कमी राहतील यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. दरम्यान, मागील ३ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांत सरकारी यंत्रणेविरोधात असंतोष पसरला आहे. शुक्रवारी (ता.२७) नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन सुटीवर असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या जागी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी निवेदन स्वीकारले. 

कांद्याला हमीभाव द्या
कांदा शेती अनेक समस्यांमधून जात आहे. खते, कीडनाशके, मजुरी यांचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्याचा प्रपंच चालणे मुश्किल बनले आहे. यात कांद्याला तीन हजारा़च्या वर दर मिळाल्याने दिलासा मिळत असताना सरकारी यंत्रणांनी दर पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कृषीप्रधान देशात हे दुदैवी आहे. शासनाने कांदा शेतीला सावरावे, हमीभाव द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी प्रवीण रौदळ, श्रीकांत वाघ, दीपक वाघ, संदीप शिरसाठ, सुनील पगार, हिरामण सूर्यवंशी, संदेश पगार आदी शेतकरी उपस्थित होते.

कांद्याचे दर पाडण्याची भूमिका प्रशासनाची नाही. आम्ही फक्त नेमका किती कांदा आवक झाला व व्यापाऱ्यांकडून पाठवला गेला, याची माहिती घेत आहोत. व्यापऱ्यांकडील कांद्याची तीन दिवसांपेक्षा अधिक काळ साठवणूक होणार नाही याकडे लक्ष देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत.
- रामदास खेडकर, 
निवासी उपजिल्हाधिकारी  

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...