agriculture news in marathi, farmers demand to start gram procurment center in sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
हरभरा खरेदी केंद्राची मागणी नोंदवली आहे. तासगाव येथे हे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच केंद्र सुरू होईल.
- आर. एन. दानोळी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सांगली.
सांगली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याची २८ हजार ७३१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हरभरा काढणी सुरू झाली असून, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने हरभऱ्याची विक्री करता येत नाही. हरभऱ्याला शासनाने ४४०० रुपये क्विंटल असा दर जाहीर केला आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कमी दरात हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी हरभरा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
 
यंदा पाण्याची उपलब्धता आणि चांगला झालेला परतीचा पाऊस यामुळे हरभऱ्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २७ हजार ८३६ हेक्‍टर असून, चालू हंगामात २८ हजार ७३१ हेक्‍टर म्हणजे १०४ टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात हरभरा पिकावर कोणताही कीड-रोगांचा प्रादुर्भाव न झाल्याने पीक चांगले आहे. या वर्षी हरभऱ्याचे उत्पादनातही काहीशी वाढ झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
 
हरभरा काढणीपूर्वी दर चांगले होते, जसा हरभरा मार्केटमध्ये येऊ लागला, तशी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. शासनाने हरभऱ्यास ४४०० रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे हरभऱ्याची खरेदी सुरू केली आहे. दुसरीकडे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शासनाने कोठेही केंद्र सुरू केलेले नाही. 
 
या वर्षी जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची लूट सुरू केली आहे. मशागत, खत, मळणी, मजुरीचा खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात मार्चअखेर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरजही आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...