agriculture news in marathi, farmers demand for starting black gram and mung purchasing centers, akola, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम सुरू झाला असून, दुर्दैवाने कुठल्याच बाजारात मूग, उडिदाला हमीभावाइतकाही दर मिळेनासा झाला अाहे. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास अाणखी किती दिवस लागतील याचे स्पष्ट उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.

अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम सुरू झाला असून, दुर्दैवाने कुठल्याच बाजारात मूग, उडिदाला हमीभावाइतकाही दर मिळेनासा झाला अाहे. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात अाहे. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास अाणखी किती दिवस लागतील याचे स्पष्ट उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.

सध्या बाजारात उडिदाची सरासरी ३८०० व मुगाची खरेदी सरासरी पाच हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत अाहे. वास्तविक केंद्र शासनाने मुगाचा हमीभाव ६९७५ तर उडिदाचा ५६०० रुपये क्विंटल असा जाहीर केला अाहे. मात्र या हमीभावाच्या अासपासही सध्या बाजारात दर मिळेनासा झालेला अाहे. हमीभाव व सध्याचे बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत तयार झालेली अाहे.

वास्तविक सध्या बाजारात चांगल्या दर्जाचा शेतमाल विक्रीला येत अाहे. मूग, उडिदाची काढणी बऱ्यापैकी झाल्याने बाजारपेठांमधील अावक सातत्याने वाढत अाहे. असे असताना खरेदी केंद्रे मकी या काळात सुरू झालेली नाहीत. शासनाने मागील हंगामापासून शेतमाल खरेदीपूर्वी शेतकऱ्यांकडून अाॅनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक केलेले अाहे.

शिवाय या वर्षीपासून खरेदी केंद्र उघडण्यासाठी संबंधित मध्यस्थ संस्थेला अनेक बाबींची पूर्तता करणे सक्तीचे करण्यात अाले. जोपर्यंत ही मध्यस्थ संस्था कागदपत्रे, मागील तीन वर्षातील संस्थेचे अाॅडिट, पॅन, बँक खाते व इतर माहितीची पूर्तता करीत नाही तोवर खरेदी केंद्रसुद्धा मिळणार नाही. या नव्या पद्धतीमुळे शासन दरवर्षी होणारी बदनामी टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात अाहे.

वऱ्हाडात या हंगामात मुगाचे लागवड क्षेत्र ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक तर उडिदाचे ५५ हजार हेक्टर होते. काही भागात मुगाचे एकरी दोन ते साडेतीन क्विंटलपर्यंत उत्पादनही झाले. उडिदाचेही पीक समाधानकारक येत अाहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास बाजारपेठांमधील दरसुद्धा वधारतात, असा अनुभव असल्याने शासनाने तातडीने हे खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...