agriculture news in marathi, Farmer's demand for three rounds from the fall for Rabbi | Agrowon

रब्बीसाठी गिरणातून तीन आवर्तनांची शेतकऱ्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

जळगाव : गिरणा नदीवरील गिरणा धरणात यंदा ५० टक्केही जलसाठा नाही. यंदा फक्त ६८ टक्के पाऊस झाला. गिरणा नदीचे पाणी नाशिक जिल्ह्यातील नंदगाव, मालेगाव आदी तालुक्‍यांना का देता? या धरणातून तीन आवर्तने रब्बी हंगामासाठी मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबरोबरच नाशिकला पाणी देण्यास आमदार किशोर पाटील, स्मिता वाघ व शिरीष चौधरी यांनीही विरोध केल्याची माहिती मिळाली.  

जळगाव : गिरणा नदीवरील गिरणा धरणात यंदा ५० टक्केही जलसाठा नाही. यंदा फक्त ६८ टक्के पाऊस झाला. गिरणा नदीचे पाणी नाशिक जिल्ह्यातील नंदगाव, मालेगाव आदी तालुक्‍यांना का देता? या धरणातून तीन आवर्तने रब्बी हंगामासाठी मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबरोबरच नाशिकला पाणी देण्यास आमदार किशोर पाटील, स्मिता वाघ व शिरीष चौधरी यांनीही विरोध केल्याची माहिती मिळाली.  

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्‍यात आहे. परंतु ते चाळीसगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. ते जळगाव जिल्ह्यासाठी बांधले आहे. जिल्ह्यातील २१ हजार हेक्‍टर जमिनीला या धरणाचा लाभ होतो. परंतु यंदा त्यात जलसाठा कमी आहे. मागील वर्षी ७० टक्के जलसाठा होता.

यंदा रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची मदार आहे. कारण खरिपात फटका बसला. या एकमेव धरणाचा लाभ जिल्ह्यातील पश्‍चिम भागाला होतो. इतर प्रकल्प नाहीत. जे प्रकल्प आहेत, त्यात जलसाठाच नाही. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा व एरंडोलातील बहुळा, मन्याड, अंजनी, बोरी, भोकरबारी हे प्रकल्प कोरडेच आहेत. हिवरा व अग्नावती प्रकल्पात तेवढा किरकोळ साठा आहे. यामुळे गिरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाचोरा, भडगाव, पारोळापर्यंत पाणी आवश्‍यक असेल.

रब्बीसाठी भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव एरंडोल तालुक्‍याला गिरणा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले जाते. त्यासंबंधी अजून पाणी आरक्षण निश्‍चित झालेले नाही. त्याबाबत जलसंपदा विभागाची बैठक तातडीने घेतली जावी. नाशिक जिल्ह्यास पाणी अधिक न देता ते जळगाव जिल्ह्याला दिले जावे. रब्बीसाठी तीन आवर्तने दिली जावीत. पिण्याच्या पाण्यासाठीदेखील स्वतंत्र आवर्तने दिली जावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...