agriculture news in Marathi, farmers demanding permission for burn sugarcane in Aurangabad district, Maharashtra | Agrowon

ऊस जाळण्याची परवानगी द्या : शेतकऱ्यांची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : मिळणाऱ्या दरात ऊसपीक परवडत नसल्याने पीक जाळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजलगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात मंगळवारी (ता.७) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत निवेदन सादर केले. 

औरंगाबाद : मिळणाऱ्या दरात ऊसपीक परवडत नसल्याने पीक जाळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजलगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात मंगळवारी (ता.७) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत निवेदन सादर केले. 

माजलगाव तालुक्‍यात उसाला खर्चाला परवडणारे दर देण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घ्यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतकऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली. यंदा मजुरी ३०० रुपयांवर पोचली, खताचे दर २४०० रुपयांवर पोचले, नांगरणीचा दर १५०० रुपये व ढेवळ भुगा करण्याचे दर ७०० रुपये झाले आहेत. ऊस लावणीचा दर ५ हजार रुपये आहे. उसाला गुजरातमध्ये ४७४१ रुपये, पश्चिम महाराष्ट्रात ३००० ते ३४०० मग मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच २००० रुपयांचा दर का, असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

उसाला मिळणारे आजचे दर परवडत नाहीत. त्यामुळे आम्हाला ऊस जाळण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच माजलगाव परिसरातील तीन कारखान्यांकडून २६५ या ऊस वाणाची नोंद घेणार नसल्याचे म्हटले आहे.

कारखान्यांनीच उसाचे बेणे २००० ते २५०० रुपये दराने दिले असताना त्याची नोंद न घेण्यामागे शेतकरी म्हणून आमची काय चूक, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी दरासंबंधी वरिष्ठांकडे शेतकरी मागणीची माहिती पाठविली जाईल व रिकव्हरी; तसेच काटामारीविषयी चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...