agriculture news in marathi, farmers deprived from crop insurance compensation, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील ५७ हजार शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

गेल्या वर्षी खरीप हंगामात चार एकर सोयाबीन पेरले होते. कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. पीकविमा घेऊन सोयाबीनला संरक्षित केले होते. मात्र, अद्यापही पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही.
- संजय पाटील, पाटगाव, ता. मिरज.

सांगली ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप २०१७ मध्ये जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ५२४ शेतकरी सहभागी झाले. यापैकी ५८ हजार ५७७ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २२ कोटी ७९ हजार विमा नुकसानभरपाई मिळाली आहे. मात्र, अद्यापही ५७ हजार ९४७ शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पीकविमा नुकसानीबाबत कृषी विभागाने दुर्लक्ष केले आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. जिल्ह्यातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती देखील केली. यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ५२४ कर्जदार आणि बिगरकर्जदार असे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ३९ लाख ९४ हजार लाख रुपये भरले आहेत. ही रक्कम गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संबंधित विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या योजनेतून  ५८ हजार ५७७ शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २२ कोटी ७९ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित ५७ हजार ९४७ शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा कृषी विभागाचे दुर्लक्ष
पीकविम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी तक्रार झाल्याने त्यामुळे बॅंकेने कृषी आयुक्तालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये ३० ऑगस्ट २०१८ ला पीकविमा कंपनीस नुकसानभरपाई कृषी आयुक्त कार्यालयाने सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही पीकविमा कंपनीने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कृषी विभागाने उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाईसाठी कार्यवाही करावी, अशी बॅंकेने मागणी केली आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे पीकविम्याची नुकसानभरपाईची रक्कम अडकून राहिली आहे.

विमा कंपनीकडून रक्कम वर्गच नाही
पीक विम्याची रक्कम बॅंकेत जमा झाली आहे. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. पीकविम्याची रक्कम अद्यापही आलेली नाही. चार दिवसांनी या असे सांगितले जाते, तर काही बॅंकेतील अधिकारी सांगतात, की विमा कंपनीकडे पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी रक्कम जमा केली नाही. त्यामुळे रक्कम कधी वर्ग होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना घेऊन सोबाबीन पिकाला संरक्षण दिले होते. वेळेत पाऊस झाला नाही त्यामुळे पिकाचे नुकसान झाले. पीकविम्याची रक्कम खात्यावर जमा झाली आहे, यासाठी सातत्याने हेलपाटे मारतोय. मात्र, बॅंकेतील अधिकारी सांगतात, की विमा कंपनीकडे पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी रक्कम जमा केली नाही, असे पाटगाव (ता. मिरज) येथील शेतकरी भागवत पाटील यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...