agriculture news in Marathi, farmers deprived from fruit crop insurance scheme in jalgaon, Maharashtra | Agrowon

वणवण करूनही फळपीक विमा योजनेपासून वंचितच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

आमच्यासारखे अनेक बिगरकर्जदार व कर्जमाफीच्या गोंधळात अडकलेले शेतकरी फळपीक विमा योजनेपासून वंचित असून, योजनेची मुदत वाढविली जावी. 
- धर्मराज पाटील, शेतकरी, वढोदा, ता. चोपडा, जि. जळगाव 

जळगाव ः आपल्या केळी पिकाला विमा संरक्षण मिळावे, यासाठी बिगरकर्जदार असलेले दोन शेतकरी मागील १० दिवस वणवण फिरले. आपले सरकार केंद्र, बॅंक, अशा चकरा त्यांनी मारल्या...विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर अनेक वेळा फोन केले...पण तेथे फोन स्वीकारला जात नव्हता...शेवटी योजनेत सहभागाची ३१ ऑक्‍टोबर ही मुदत संपली...अशा सगळ्या सावळ्या गोंधळात त्यांचे विमा योजनेचे अर्जच भरले गेले नाहीत. या शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव ‘ॲग्रोवन’ला सांगत असताना फळपीक विमा योजना फसवी असल्याचा आरोपही केला.

वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील धर्मराज पुंडलिक पाटील यांना आपल्या सहा हेक्‍टर केळीसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून विमा संरक्षण घ्यायचे होते. ते बिगरकर्जदार प्रकारात असून, त्यासाठी त्यांनी आपल्या गावानजीकच्या होळनांथे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील स्टेट बॅंकेत संपर्क साधला; पण या बॅंकेने आपल्याकडे बिगरकर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करण्यासंबंधी शासनाचे परिपत्रक नसल्याचे सांगितले. नंतर पाटील हे चोपडा शहरात आपले सरकार केंद्रात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी गेले. तीन केंद्रांत त्यांना नकारघंटा ऐकायला मिळाली. पोर्टलच सुरू होत नसल्याचे त्यांना सांगितले गेले. 

किनोद (ता. जळगाव) येथील सतीश सीताराम पाटील हेदेखील बिगरकर्जदार शेतकरी असून, त्यांना चार हेक्‍टर केळीसाठी विमा संरक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी आपल्या गावानजीकच्या भोकर (जि. जळगाव) येथील स्टेट बॅंकेत संपर्क साधला; पण बॅंकेने अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला. मग पाटील हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जळगाव शहरात आपले सरकार केंद्रात पोचले. जळगाव शहरातील पाचही आपले सरकार केंद्रांत त्यांना हे अर्ज भरता येत नाहीत, पोर्टलच सुरू होत नाही, असे सांगण्यात आले.

टोल फ्री क्रमांकावर प्रतिसाद मिळेना
आपली अडचण विमा योजनेसंबंधी नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्को कंपनीला सांगण्यासाठी सतीश पाटील व धर्मराज पाटील या दोघांनी कंपनीने जारी केलेल्या ०२२६६३८३६९९ आणि ०२२६६३८३६९० या टोल फ्री क्रमांकांवर १०० वेळेस फोन केले; पण तेथे प्रतिसादच मिळाला नाही. शेवटी हतबल झालेले हे दोन्ही शेतकरी फळपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. विमा हप्ता भरण्याची मुदत ३१ ऑक्‍टोबर होती. आता योजनेत सहभागी होण्यासंबंधी कुठलीही शक्‍यता नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...