Agriculture news in Marathi, farmers of Dhavalpuri suffered a loss of six lakh due to bogus seeds | Agrowon

निकृष्ट बियाण्यांमुळे ढवळपुरी येथील शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान
दत्ता झगडे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पारनेर : शेतात वेगळा प्रयोग करुन चांगले उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने ढवळपुरी (ता. पारनेर) येथील शिवाजी चौधरी या शेतकऱ्याने स्वीट कॉर्नचे पीक घेतले. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे त्या शेतकऱ्याला तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले.

शेतकऱ्याने बियाणे कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

ढवळपुरी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी चौधरी यांनी नगर येथून एका कंपनीचे मका शुगर ७५ या जातीचे पाच किलो बियाणे घेतले. १२ जूनला शेतीची योग्य मशागत करुन सरी पध्दतीने मक्याची लागवड केली. मात्र मकेला पांगारी फुटवे फुटले.

पारनेर : शेतात वेगळा प्रयोग करुन चांगले उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने ढवळपुरी (ता. पारनेर) येथील शिवाजी चौधरी या शेतकऱ्याने स्वीट कॉर्नचे पीक घेतले. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे त्या शेतकऱ्याला तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले.

शेतकऱ्याने बियाणे कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

ढवळपुरी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी चौधरी यांनी नगर येथून एका कंपनीचे मका शुगर ७५ या जातीचे पाच किलो बियाणे घेतले. १२ जूनला शेतीची योग्य मशागत करुन सरी पध्दतीने मक्याची लागवड केली. मात्र मकेला पांगारी फुटवे फुटले.

चौधरी यांनी याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. मात्र कंपनीच्या प्रतिनिधीने ते फुटवे खोडण्यास शेतकऱ्याला सुचविले. त्यानंतरही फुटवे येतच राहिले. जेव्हा मकेला कणसे यायला लागली, तेव्हा एका कणसाला दोन-दोन कणसे फुटली. शेतकऱ्याने या बाबत पुन्हा कंपनीकडे तक्रार केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्यानंतर चौधरी यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीनंतर ८ ऑगस्ट रोजी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहाय्यक मका पैदासकर डॉ. जी. सी. शिंदे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर कंपनीचे प्रतिनिधी विकास मोराळे यांच्या तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने पिकाची पाहणी केली.

या पाहणीत समितीने ४१ टक्के मकेला पांगारी फुटवे फुटल्याचे तर ३२ टक्के झाडांना एकाच ठिकाणी दोन ते तीन कणसे निघाल्याचे सांगितले. त्याचा कणसाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्याचा अहवाल दिला आहे.

टॅग्स

इतर बातम्या
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
बोंड अळीची नुकसानभरपाई मिळेनाभांबेरी, जि. अकोला ः मागील हंगामात कपाशीवर...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
धनगर समाजाचे अकोल्यात आंदोलनअकाेला : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (...
पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गेल्या दोन...
नाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीचनाशिक  : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...
ठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...
‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...
बोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...
धुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...
सहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : "सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...
दहिगाव उपसा सिंचन योजनेतून लवकरच आवर्तन करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यात...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...