agriculture news in marathi, Farmers disadvantaged with the help of Bondali | Agrowon

शेतकरी बोंड अळीच्या मदतीपासून वंचित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नागपूर : बोंड अळीग्रस्तांना शासनाकडून सुमारे वर्षभरापैकी मदत जाहीर करण्यात आली. मात्र, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा आहे, तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, हे विशेष. 

नागपूर : बोंड अळीग्रस्तांना शासनाकडून सुमारे वर्षभरापैकी मदत जाहीर करण्यात आली. मात्र, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा आहे, तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, हे विशेष. 

मागील वर्षी खरीप हंगामात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने बोंड अळीग्रस्तांना तीन प्रकारे मदत देण्याचे जाहीर केले होते. यात केंद्राच्या मदतीसोबत बियाणे कंपनी आणि पीक विम्याच्या मदतीचा समावेश होता. पीकविम्याचा फायदा मोजक्‍याच शेतकऱ्यांना झाला, तर बियाणे कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना मदती दिली नाही. फेब्रुवारी महिन्यात मदतीचा आदेश काढला. प्रत्यक्ष मदतीची रक्कम मार्च, एप्रिलमध्ये मिळाली.

नागपूर जिल्ह्यात १ लाख १० हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याला २२ कोटींचा निधी देण्यात आला. मदतीसाठी शासनाने शासकीय प्रकल्पाचे निकष लावले. पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील निधी देण्याचा निर्णयाचा त्यामध्ये समावेश होता. पावसाळी अधिवेशनादरम्यान शासनाने मदतीचा दुसऱ्या टप्प्यातील निधी दिला. याला आज अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाची माहिती सादर केल्यावर अद्याप नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यातील मदत निधी देण्यात आला नाही. त्यामुळे हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

नागपूर जिल्ह्याची ७० कोटींची मागणी असून, दोन टप्प्यांत ५४ कोटी रुपये देण्यात आले. जिल्ह्याचा १६ कोटींचा, तर वर्धा जिल्ह्याचा सव्वा कोटीचा निधी शिल्लक आहे. नागपूर जिल्ह्याकडून दोनदा पत्रव्यवहार करूनीही ही रक्कम देण्यात आली नाही.

इतर बातम्या
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...