कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा नाही : शरद पवार
ज्ञानेश उगले
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017
नाशिक ः कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण असून शेतकऱ्यांना आजवर फक्त आशा लावून ठेवली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला दिसून येत नाही, असे सांगत वाढलेली महागाई, नोटाबंदी, शेतमाल किमतीची बिकट अवस्था अादी मुद्यांना अनुसरून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर चौफेर टीका केली.
 
नाशिक ः कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण असून शेतकऱ्यांना आजवर फक्त आशा लावून ठेवली आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला दिसून येत नाही, असे सांगत वाढलेली महागाई, नोटाबंदी, शेतमाल किमतीची बिकट अवस्था अादी मुद्यांना अनुसरून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर चौफेर टीका केली.
 
ते सावरकरनगर येथील नंदनवन लॉन्स येथील शेतकरी अधिवेशनात बोलत होते. या वेळी किसान मंचचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
 
या वेळी श्री. पवार म्हणाले, की शेतकरी चळवळीची सुरवात कायम नाशिकपासून होत असते. राज्यात आणि देशात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. महागाईने देशात उच्चांक गाठला आहे. संपूर्ण जगात पेट्रोल आणि 
डिझेलचे भाव घसरले आहेत; पण भारतात मात्र वाढतच आहेत. तेलासंदर्भात देशात लूट सुरू असून, सर्वसामान्य नागरिक मात्र आता त्रस्त झाला आहे.
 
आज शेतीमालाच्या किमतीची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी उद्धस्त झाला, तर देश उद्धस्त होईल. देशात हाहाकार माजेल. शेतीमालाच्या किमतीबरोबर खेळणे देशाला परवडणार नसून सरकारने लवकरात लवकर पावले उचलायला हवीत. आज बळिराजा गप्प आहे; उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तो कुणाच्या बापाला घाबरणार नाही. नाशिक जिल्हा कृषिप्रधान जिल्हा आहे; तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याची खंत वाटते. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. 
 
सरसकट कर्जमाफी देणार, असे भाजपने जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन पाळले नाही, असे ते म्हणाले.सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कर्जमाफी मुद्द्यावर त्यांनी टीका केली. सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही; त्यामुळे सामुदायिक ताकत दाखवण्याची वेळ आली अाहे, असे श्री. पवार म्हणाले. 
 
 ‘राष्ट्रवादी’ने सरकारला दिला अल्टिमेटम
आता शेतकऱ्यांची ताकत केंद्र आणि राज्य सरकारला दाखवणार असल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’ने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या ५ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार असून, सरकारला धारेवर धरले जाणार आहे. या बैठकीस शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...