agriculture news in Marathi, farmers dont have money, Maharashtra | Agrowon

जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

चारा तसेच पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे म्हैस खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमीच आहे.
- जानकरीराम रायमले, म्हैस व्यापारी, परभणी.

परभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी मागणी असल्यामुळे बैलजोड्यांच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे. परंतु, दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे परभणी येथील खंडोबा मैदानावर दर गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारातील बैलजोडी खरेदी विक्रीचे बहुतांश व्यवहार उधारीवरच होत असल्याचे चित्र होते.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळामुळे चारा तसेच पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून परभणीच्या गुरुवार बाजारात मोठ्या प्रमाणावर पशुधन विक्रीसाठी येत आहे. परंतु, घेणारे कमी असल्यामुळे उलाढाल कमीच आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यापासून बैलजोडी खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. परंतु, यंदा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला असताना बैलांच्या बाजारात दरवर्षीसारखी उलाढाल नाही. परंतु, गेल्या दोन बाजारांच्या तुलनेत गुरुवारी (ता. १६) बैलजोडी खरेदी करणऱ्या शेतकऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती. त्यामुळे रंगरूप तसेच जातीनुसार बैलजोड्याच्या किमतीमध्ये सुधारणा झाली होती. 

लाल कंधारी बैलजोडीच्या किमतीत ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांहून ९० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत वाढ झाली. अन्य जातींच्या बैलजोडीच्या किमतीत ५ ते १० हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान बैलजोडी ४० ते ८० हजार रुपये, खिल्लार बैलजोडीचे दर ४५ ते ९० हजार रुपये होते. जाफ्राबादी म्हशीच्या किमती एक ते सव्वालाख रुपये, मऱ्हा जातीच्या म्हशीच्या किमती ९० हजार ते १ लाख रुपये पर्यंत होत्या.

परंतु, दुष्काळामुळे बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या ओळखीनुसार महिनाभर तसेच खरीप पिकांच्या सुगीवर उधारी देण्याच्या बोलीने व्यवहार करत आहेत. तुरळक प्रमाणात रोखीने व्यवहार होत आहे.

प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी परिस्थिती चांगली होती. आता गेल्या आठवड्यापेक्षा बैलजोड्यांच्या किमतीत तेजी आहे; परंतु उधारीवर द्यावे लागत आहे. शेतीकामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्यामुळे बैलजोडी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
- सय्यद अब्दुल पाशामिया, बैल व्यापारी, धनगर टाकळी, ता. पूर्णा.

महिनाभरापूर्वी एका व्यापऱ्याला ५५ हजार रुपयांना गावरान बैलजोडी उधारीवर विकली होती. व्यापाऱ्याने आजच्या बाजारात पैसे दिले.
- बाळासाहेब पुंड, शेतकरी, इटलापूर, जि. परभणी.

एखाद्या बाजारात बोहणीदेखील होत नाही. सट्ट्या-बट्ट्याचे व्यवहारदेखील कमीच आहेत. वाहतूक, चारा पाण्यावर खर्च होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन, मुगापर्यंत बैलजोडी उधारीवर द्यावे लागत आहे.
- शेख रहिमोद्दीन, व्यापारी, परतूर, जि. जालना.

पेरणीचे काम अडू नये म्हणून घरचा एक बैल विकला. त्याचे पैसे तसेच पदरमोड करून ८५ हजार रुपयाला गावरान बैलजोडी विकत घेतली.
- विश्वनाथ कंठाळे, शेतकरी, वाघी बोबडे, ता. जिंतूर.

 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...