शेतकऱ्याचा मेहनताना केवळ २३१ रुपये रोज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतीसाठी राबतो. मुबलक व चांगले अन्नधान्य देऊन देशाची भूक भागविण्याची सर्कस तो करतो, पण त्याला फक्त २३१ रुपये रोज मिळतो, असे राज्य कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशींच्या माध्यमातून स्पष्ट झाले असून, हा मोबदला राज्य शासन किंवा केंद्राच्या सेवेतील वर्ग चार कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या रोजच्या मेहनतान्यापेक्षा कमी असल्याचेही उघड झाले आहे.

आगामी काळात अन्नधान्य व इतर शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्यासंबंधी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने राज्यांकडून शिफारशी मागविल्या आहेत. या शिफारशी राज्य आयोगाने कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ, समित्यांकडून संकलित करून त्यासंबंधी मंगळवारी (ता.९) मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेतली.

या बैठकीत कृषी व पणनमंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागाचे पणन सचिव, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आदी  सहभागी झाले.कृषी विद्यापीठांकडून शेतीचा उत्पादनखर्च व इतर बाबींचा अभ्यास करून तयार केलेला अहवाल बैठकीत सादर करण्यात आला.

यात उत्पादनखर्चात शेतकऱ्याचा रोजचा मेहनताना २३१ रुपये एवढा गृहीत धरल्याचे समोर आले. त्यावर धुळे येथून या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी प्रतिनिधी ॲड. प्रकाश पाटील यांनी दुरुस्ती सुचविली. हा मेहनताना राज्य शासनात जसे वर्ग १, २, ३ व ४ कर्मचारी आहेत, त्यानुसार असावा. म्हणजेच अल्पभूधारक, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणारा शेतकरी, अधिक जमीनधारक, बागायतदार, कोरडवाहू शेतकरी, अशी विगतवारी करून ठरावा. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा मेहनताना २३१ रुपये असू नये, अशी दुरुस्ती सूचविल्याची माहिती मिळाली.

कपाशीचा खंडदर हेक्‍टरी ९२०० कपाशी पिकाचा खंड दर वार्षिक ९२०० रुपये आहे. त्यात बदल करण्याची सूचनाही शेतकऱ्यांनी केली. कारण कपाशी पीक राज्यात अधिक आहे. ते परवडत नाही, तसेच उत्पादनखर्च ठरविताना जोखिमा गृहीत धरलेल्या नसल्याचेही सादरीकरणादरम्यान समोर आले. त्यात कपाशीसह इतर अनेक पिके दुष्काळ, रोगराई, किडींमुळे संकटात येतात. त्यात उत्पादन निम्म्यावर येते. या जोखिमांसह उत्पादन खर्च धरावा, अशी सूचना शेतकरी प्रतिनिधी पाटील यांनी केली.

आता २१०० रुपये मार्केटिंग फेडरेशनचे सभासदत्व मार्केटिंग फेडरेशन संस्था, सोसायट्या, संघांना विविध वर्गात सभासदत्व देताना २१ हजार रुपये शुल्क आकारले. हे शुल्क कमी करावे, अशी मागणी आपण या बैठकीनिमित्त मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक केरकट्टा यांच्याकडे केली. ती त्यांनी मान्य केली असून, शेतकी संघ किंवा इतर सोसायटी, शेतकरी उत्पादक कंपनीला २१०० रुपयांत ब वर्ग सभासदत्व फेडरेशन देईल, असे केरकट्टा यांनी आपल्यास सांगितल्याची माहिती ॲड. प्रकाश पाटील (धुळे) यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com