agriculture news in Marathi, farmers on fast today, Maharashtra | Agrowon

सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

यवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात आज (ता. १९) अन्नत्याग करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध संघटनांसह शेतकरी यात सहभागी होत आहेत. 

दरम्यान, दरवर्षी होणारे अन्नत्याग आंदोलन यंदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता माहिती आहे. उपवास करण्याला बंदी नसली तरी अन्नत्याग आंदोलन असे नाव असल्याबद्दल प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. 

यवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात आज (ता. १९) अन्नत्याग करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध संघटनांसह शेतकरी यात सहभागी होत आहेत. 

दरम्यान, दरवर्षी होणारे अन्नत्याग आंदोलन यंदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता माहिती आहे. उपवास करण्याला बंदी नसली तरी अन्नत्याग आंदोलन असे नाव असल्याबद्दल प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. 

चिलगव्हाण येथील रहिवासी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणा, दुष्काळीस्थितीला कंटाळत १९ मार्च १९८६ रोजी आपले जीवन संपविले होते. वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमालगतच्या दत्तपूर येथे त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखली जाते. या शेतकरी कुटुंबाला श्रद्धांजली म्हणून दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राज्यभरात केले जाते. 

करपे यांचा मूळ गावी चिलगव्हाण येथे काळी रांगोळी काढून आणि काळी रिबीन आपल्या हाताला बांधत ग्रामस्थ निषेध नोंदवितात. या वर्षी मात्र प्रशासनाने उपवास करण्यासोबतच कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यापासून ग्रामस्थांना रोखले आहे. लोकसभेची आचारसंहिता असल्याचे कारण प्रशासनाने यामागे दिले आहे. परंतु अहिंसात्मक मार्गाने उपवास करणे गुन्हा कसा? असा प्रश्‍न शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

दरम्यान प्रशासनाच्या या भूमिकेमुळे अडचणीत आलेल्या चिलगव्हाण ग्रामस्थांनी करपे कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्याचाच निर्णय घेतला आहे. परंतु त्याबाबतही अनिश्‍चितता असल्याचे सांगितले जाते. 

कविसंमेलनही रद्द
रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत महागाव (यवतमाळ) येथे शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्‍त करणाऱ्या कवींच्या कवितांचे संमेलन होणार होते. परंतु परवानगीच्या कारणामुळे तेदेखील रद्द करण्यात आले.  

अमर हबीब यांचे राजघाटावर उपोषण
उपवास करण्याला बंदी नाही. त्यामुळे १९ मार्च रोजी आम्ही दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी राजघाट येथे उपवासावर ठाम असल्याचे किसान आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...