agriculture news in marathi, farmers fedup of Gform, Marathwada | Agrowon

बोंड अळीग्रस्त आता ‘जीफार्म’ने त्रस्त
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : बोंड अळीने फस्त कपाशीच्या क्षेत्राची तिव्रता जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून ‘जी फॉर्म’ भरून घेतले जात आहेत. मात्र, यामध्ये येणाऱ्या अडचणी व तो भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून याविषयी काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तसे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

औरंगाबाद : बोंड अळीने फस्त कपाशीच्या क्षेत्राची तिव्रता जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून ‘जी फॉर्म’ भरून घेतले जात आहेत. मात्र, यामध्ये येणाऱ्या अडचणी व तो भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून याविषयी काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तसे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी जी फॉर्म सातबारा, आठ अ, बियाणे खरेदी बीलाची सत्यप्रत, बियाणे बॅगवरील लेबल, आधारकार्ड आदी आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात जी फॉर्म स्वीकारण्याविषयी वेगवेगळ्या पद्‌धती अवलंबिल्या जात असल्याचे सांगितले जात असल्याने या फॉर्मसोबत नेमक हवयं काय यासंदर्भात अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात बारकोड सातबारा, आधारकार्ड झेरॉक्‍स, पासबूक झेरॉक्‍स, एखाद्या शेतकऱ्याने एकापेक्षा जास्त प्रकारच्या कंपन्यांचे बियाणे वापरले असल्यास त्या प्रमाणात अर्ज, असं शेतकरी सांगतात. मुळात एक बारकोड सातबारा काढण्यासाठी किमान ३० रुपये लागतात. शिवाय तो प्रयत्न करूनही अनेकदा निघत नाही. निघाला तर त्यावर पेरा मागच्या वर्षीचा येतो. त्यामुळे पुन्हा तलाठ्याकडून यंदाचा पेरा आणन्याचा सल्ला मिळतो.

एक ‘जी फॉर्म’ भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना किमान अडीचशे रुपये खर्च करावे लागतात. एकापेक्षा जास्त कंपनीच्या बियाण्यांसाठी वेगवेगळा अर्ज करावा लागला तर मग खर्च व वेळ जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. बियाणे खरेदी पावती नसने, सातबारावर पेरा नसने, एकाच शेतकऱ्याच्या नावावर एकत्रीत कुटूंब पद्धतीत बियाणे खरेदी करणे, प्रत्यक्षात त्याच्या नावावर बियाण्याच्या तुलनेत क्षेत्र नसने आदी प्रमुख अडचणींसह कृषी किवां संबंधीत यंत्रणेचा कुणीही जाणीवपूर्वक याविषयी माहिती देण्यासाठी न येणे आदी अडचणी औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांकडून सरसकट पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
उठलेला बाजारसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन...
न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी शेतकरी राज्यातील आदिवासी भागात लाखो शेतकरी आपल्या...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
उसाला निर्यातक्षम केळीची जोडसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...