agriculture news in marathi, Farmers to file police complaint for chickpea payment | Agrowon

हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस कारवाईचा इशारा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या हरभऱ्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने जिल्ह्यातील वरुडी येथील दोन शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देण्याच्या इशारा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना दिला अाहे. जनार्दन गारोळे व ज्ञानदेव गारोळे अशी या शेतकऱ्यांची नावे अाहेत. 

बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या हरभऱ्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने जिल्ह्यातील वरुडी येथील दोन शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देण्याच्या इशारा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना दिला अाहे. जनार्दन गारोळे व ज्ञानदेव गारोळे अशी या शेतकऱ्यांची नावे अाहेत. 

श्री. गारोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की वरुडी (ता. सिंदखेडराजा) येथील रहिवाशी असून, शेतीवर संपूर्ण उदरनिर्वाह अवलंबून आहे. शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सुरू केलेल्या नाफेडच्या सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघातील खरेदी केंद्रामार्फत १३ जून २०१८ रोजी हरभरा विकला. यामध्ये जनार्दन नामदेव गारोळे यांचा १९ क्विंटल व ज्ञानदेव नामदेव गारोळे यांच्या नावे ११ क्विंटल हरभरा विकण्यात अाला. मात्र त्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत. अनेक वेळा उपनिबंधक, तहसीलदारांकडे विनंती अर्ज केले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अजूनही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नाफेडने फसवणूक केली आहे. त्यामुळे नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे बँक खात्यात जमा न केल्यास साखरखेर्डा पोलिस ठाण्यात फसवणुकीबाबतची तक्रार दाखल करू.    

सिंदखेडराजा खरेदी-विक्री केंद्र मागील हंगामापासून गाजत अाहे. तूर-हरभरा खरेदी करताना वजनात तफावत, काहींचा माल दुसऱ्याच्या नावे असाही प्रकार झाल्याचे शेतकरी बोलतात. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतर जिल्हा पातळीवरुन चौकशी झाली होती. या खरेदीत प्रथमदर्शनी घोटाळा झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध सिंदखेडराजा पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल केला. तूर, हरभरा खरेदी अनियमितेत गुन्हे दाखल झाले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले अाहेत. शेतकऱ्यांचे पैसे तातडीने दिले जावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...