agriculture news in marathi, Farmers like fisheries Turn to the supplement business: Gehlot | Agrowon

शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या पूरक व्यवसायाकडे वळावे : गहलोत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत. या तलावांमध्ये ९ ते १० महिने पाणी साठून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एका हंगामात तरी मत्स्य व्यवसायाचा पर्याय निवडावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत यांनी केले.

वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत. या तलावांमध्ये ९ ते १० महिने पाणी साठून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एका हंगामात तरी मत्स्य व्यवसायाचा पर्याय निवडावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत यांनी केले.

विकास भवन येथे आयोजित तलाव तेथे मासोळी अभियानअंतर्गत मत्स्य संवर्धन व शेतीधारक शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी विभागाचे उपसंचालक कापसे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलेश मारबते, दुर्गेश केंडे, नागपूरचे सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी ऋत्‍विक वाघमोडे, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त शा. डोंमळे उपस्थित होते.

पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य शेती केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकस्राेत बळकट होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील उपलब्ध जलक्षेत्रात योग्य प्रमाणात व योग्य आकारमानाची मत्स्य बोटूकली संचयन करून शास्त्रोक्‍त पद्धतीने मत्स्य संवर्धन केल्यास जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात भर पडेल, असेही गहलोत म्हणाले. तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत १०० टक्‍के अनुदानावर मत्स्य बीज उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...