agriculture news in marathi, farmers foreign tour delayed, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा रखडला
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018
मी परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केला आहे. परंतु, अजूनही मला कोणतीही सूचना कृषी विभागाकडून मिळालेली नाही. हा दौरा कधी पार पडेल, याबाबत संभ्रम वाढला आहे. 
- विशाल किशोर महाजन, 
अर्जदार शेतकरी, नायगाव, जि. जळगाव.
जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती, प्रकल्प आदींची माहिती घेण्यासह शेतीबाबत जागरूकता आणण्यासाठी उपयुक्त ठरणारा परदेश अभ्यास दौऱ्याचा मुहूर्त अजूनही ठरलेला नाही. या दौऱ्यासंबंधीचे अर्ज कृषी आयुक्तालयात नोव्हेंबर २०१७ मध्ये पाठविले होते, परंतु कुणाची निवड झाली व दौरा केव्हा निघेल, हे स्पष्ट झालेले नाही. 
 
जिल्ह्यातील ९९ शेतकऱ्यांनी परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केले होते. हे अर्ज जून महिन्यापासून यायला सुरवात झाली होती. नोव्हेंबरअखेर त्यांची पडताळणी, तपासणी करून निकषानुसार ते कृषी आयुक्तालयात पाठविले. नंतर पुढे या अर्जांचे काय झाले, काय सूचना आल्या हे शासनाच्या कृषी विभागातील कर्मचारी सांगायला तयार नाहीत.
 
इस्राईल, ऑस्ट्रेलिया व नेदरलॅण्ड येथे दौरा आयोजित करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यासाठी निम्मा खर्च शेतकऱ्यांना करायचा आहे. निम्मा खर्च शासन करील, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. नंतर जे अर्ज आले, त्यासंबंधीची सोडतही २२ ऑक्‍टोबर २०१७ रोजी काढण्यात आली.
 
या सोडतीत, ज्यांची नावे आली, त्यांना प्रथम संधी मिळेल. दौरा मागील वर्षीच पार पडेल, असे अपेक्षित होते, परंतु नवीन वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले, तरीही परदेश शेतकरी अभ्यास दौऱ्याबाबत निर्णय का होत नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दौरा का पार पडत नाही यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी थेट कृषी आयुक्तालयाशी संपर्क साधला. परंतु तेथे या दौऱ्याचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. 

 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...