agriculture news in marathi, farmers to gather in Lakhganga on milk rate issue today | Agrowon

दूध दराच्या प्रश्नांवर लाखगंगा येथे आज बैठक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद : उत्पादकांनी फुकट दूध वाटून रोष व्यक्‍त केल्यानंतरही त्यांचा दूध दराचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे यापुढे करायचं काय? यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक लाखगंगा येथे होणार आहे. 

औरंगाबाद : उत्पादकांनी फुकट दूध वाटून रोष व्यक्‍त केल्यानंतरही त्यांचा दूध दराचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे यापुढे करायचं काय? यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक लाखगंगा येथे होणार आहे. 

दूध दराच्या प्रश्नावर ग्रामसभेतून फुकट दूध वाटप करण्याचा निर्णय लाखगंगा येथील ग्रामस्थांनी व दूध उत्पादकांनी घेतला होता. ३ ते ९ मे दरम्यान या निर्णयाच्या अनुषंगाने गावात व तालुका स्तरावर मोफत दूध वाटपात लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी सहभाग नोंदविला. लाखगंगा येथील ग्रामसभेने मोडकळीस आलेल्या दुग्धव्यवसायाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शासनाने दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्यांना अनुदान जाहीर केले. परंतु, त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांना काहीच झाला नाही. त्यामुळे जो दर आधी मिळायचा तोच कायम असल्याचे उत्पादकांनी सांगितले. 

बैठकीस आमदार बच्चु कडू यांच्यासह डॉ. अजित नवले यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. विविध जिल्ह्यातील दूध उत्पादक व दूध दराच्या प्रश्नावर लढा देणारे शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. लाखगंगा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार आहे.  त्यामुळे आता या बैठकीतून कोणता निर्णय घेतला जातो याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...