agriculture news in marathi, farmers get 1 rupee for 400 kg tomato | Agrowon

चारशे किलो टोमॅटोची पट्टी रुपया ! (व्हिडिओसह)
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

सासवड, जि. पुणे : येथील संतोष जगताप या शेतकऱ्याने ४०० किलो टोमॅटो विक्रीसाठी मुंबईला पाठविला होता. सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात एक रुपया पडला आहे. आता मजुरी कशी द्यायची, असा प्रश्‍न जगताप यांना पडला आहे. 

सासवड, जि. पुणे : येथील संतोष जगताप या शेतकऱ्याने ४०० किलो टोमॅटो विक्रीसाठी मुंबईला पाठविला होता. सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात एक रुपया पडला आहे. आता मजुरी कशी द्यायची, असा प्रश्‍न जगताप यांना पडला आहे. 

आम्ही १७ क्रेट म्हणजेच ४०० किलो टोमॅटो तोडून ३० ऑगस्ट रोजी मुंबईला अडतदाराकडे पाठविले होते. टोमॅटोची एकूण पट्टी १,३३२ रुपये झाली. मुंबईपर्यंत वाहतूक, हमाली, तोलाई, बारदाना, टपाल हा सारा खर्च १,३३१ रुपये आला. हाती केवळ एक रुपया आला. तोडणीला २ महिला व एक पुरुष मजूर होते, त्यांची मजुरी ७५० रुपये आता कोठून द्यायची, असा आमच्यापुढे प्रश्‍न आहे, जगताप यांनी सांगितले. 

पहा प्रत्यक्ष व्हीडिअो...

टोमॅटोच्या पडलेल्या बाजारभावाने उत्पादक शेतकरी निराश आहेत. बावीस ते चोवीस किलोच्या क्रेटला ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे. म्हणजे किलोमागे अडीच ते तीन रुपये भाव मिळत असून, यात उत्पादनखर्च व तोडणी मजुरीही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. टोमॅटो निर्यातीअभावी देशाबाहेर जात नाही.

काही ठराविक शहरे व स्थानिक मार्केटमध्ये त्याची आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. चांगल्या मालाची ही तऱ्हा तर लहान माल, थोडी कमी प्रतवारी असलेला टोमॅटो तर बांधावरच फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, असे पुरंदरमधील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. डाळिंबालाही बाजारभाव नसल्याने शेतकऱ्याला २५ ते ३५ रुपये किलोचा भाव मिळत आहे; पण शहरी ग्राहकांना तोच डाळिंब ८० ते ९० रुपये किलोने घ्यावा लागतो, असे एक शेतकऱ्याने सांगितले. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...