agriculture news in marathi, farmers to get 1600 honeybee box | Agrowon

शेतकऱ्यांना १६०० मधपेट्यांचे वाटप सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे : मधाचे महत्त्व वाढविण्याच्या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशीपालन व्यवसायासंबंधी केंद्र शासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना मधमाशीपालनाकडे वळविण्यासाठी राज्यातील मागणी केलेल्या १६० शेतकऱ्यांना अत्याधुनिक स्वरूपातील एक हजार ६०० मधपेट्यांचे विनामूल्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सूत्रांनी दिली.  

पुणे : मधाचे महत्त्व वाढविण्याच्या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशीपालन व्यवसायासंबंधी केंद्र शासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना मधमाशीपालनाकडे वळविण्यासाठी राज्यातील मागणी केलेल्या १६० शेतकऱ्यांना अत्याधुनिक स्वरूपातील एक हजार ६०० मधपेट्यांचे विनामूल्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सूत्रांनी दिली.  

ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण वर्ग यांना मध उत्पादनाकडे आकर्षित करून उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनार्फत पाऊले उचलली जात आहेत. शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केद्रामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक स्वरूपातील प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना मधमाशीपालनातून रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून हनी मिशनअंतर्गत मधपेट्या देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ४९ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद गेल्या वर्षी केली होती. त्यापैकी शिवाजीनगर येथील केंद्रासाठी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

या निधीतून अत्याधुनिक स्वरूपातील सोळाशे मधपेट्याचे वाटप केले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सहाशे, तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार मधपेट्यांचे वाटप केले जाणार आहे. सध्या सहाशे मधपेट्या या केद्रांवर दाखल झाल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ८० प्रशिक्षणार्थी, शेतकऱ्यांची निवड केली असून, मधपेट्यांचे वाटप केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेल्या व न घेतलेल्या शेतकऱ्यांना मधपेट्या दिल्या जाणार आहे. त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून दीड हजार रुपये आकारण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य असून, विदर्भातील शेतकऱ्यांनी नागपूर येथील केंद्राकडे संपर्क साधावा.  

केंद्राचे प्राचार्य डॉ. आर. के. सिंह म्हणाले, की आकर्षक घराच्या आकाराच्या असलेल्या नवीन मधपेट्यांमधील वातावरण नियंत्रित राहण्यासाठी पाच व्हेटिलेशन, ब्रुड चेंबर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापूर्वीच्या पेट्यांमध्ये केवळ दोन व्हेटिलेशन देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत मधपेटीसह सातेरी जातीच्या मधमाशा, मध काढतेवेळी तोंडावर लावण्यात येणारी जाळी धूरफवारणी, हातमोजे यासह पेटी ठेवण्यासाठी स्टँड देण्यात येणार आहे. आलेल्या एकूण मधपेट्यांपैकी प्रत्येकी दहा याप्रमाणे १६० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

सध्या लाकडी पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या जातात. या पेटीत दोन दालने असतात. एक खालचे वंश संगोपनाचे दालन आणि दुसरे वरचे जादा मध साठविण्याचे दालन असते. यामधील काढता घालता येणाऱ्या लाकडी चौकटीत मधमाशा मेणाची पोळी बांधतात. दोन दालनाचे वर एक तळपाटावर असते व वर छप्पर असते. खालच्या दालनात मधमाश्‍यांचा वंश असतो व वरचे दालन सर्वस्वी मधसाठविण्याकरिता वापरले जाते. या पोळ्यातून मधुनिष्कासक यंत्रांच्या साहाय्याने मध काढून घेतल्यानंतर रिकामी झालेली पोळी पुन्हा भरण्यासाठी त्या दालनात परत ठेवली जाते. 

मधपेट्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 

  •  आधार कार्ड 
  •  प्रशिक्षण प्रमाणपत्र 
  •  फोटो 
  •  करारनामा 
  •  नोंदणी शुल्क दीड हजार रुपये  
     

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...