agriculture news in marathi, Farmers to get Croploan after four years | Agrowon

बँकेच्या चुकीमुळे रखडलेला पीकविमा ४ वर्षांनंतर मिळणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

वाशीम : शेतकऱ्यांनी भरलेला पीकविमा बँकेने विमा कंपनीकडे न पाठवल्याने सन २०१४ च्या हंगामापासून शेतकरी पाठपुरावा करीत होते. विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये तहसीलसमोर अांदोलन केले. तेव्हापासून पाठपुरावा सातत्याने सुरू होता. या लढ्याला अाता यश अाले असून, शेतकऱ्यांना तो पीकविमा मिळणार अाहे. 

वाशीम : शेतकऱ्यांनी भरलेला पीकविमा बँकेने विमा कंपनीकडे न पाठवल्याने सन २०१४ च्या हंगामापासून शेतकरी पाठपुरावा करीत होते. विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये तहसीलसमोर अांदोलन केले. तेव्हापासून पाठपुरावा सातत्याने सुरू होता. या लढ्याला अाता यश अाले असून, शेतकऱ्यांना तो पीकविमा मिळणार अाहे. 

सन २०१४ च्या खरीप हंगामात रिसोड तालुक्यातील सुमारे पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अलाहाबाद बँकेच्या रिसोड शाखेत पिकविमा भरला होता. परंतु सदर विम्याची रक्कम या शाखेने विमा कंपनीकडे पाठवलीच नव्हती. परिणामी शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला तेव्हापासून मिळाला नव्हता. या पाचशे शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळण्यासाठी श्री. भुतेकर यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन तहसीलदार अमोल कुंभार यांनी बँकेची चूक असल्याचा स्पष्ट अहवाल दिला होता. याअाधारे सातत्याने शासन, प्रशासन आणि बँकेकडे पत्र व्यवहार करण्यात अाला. अखेर बँकेने चूक मान्य करून शेतकऱ्यांना  स्वतःच्या फडांतून पैसे देण्याचे मान्य केले. 

या अनुषंगाने रिसोडचे तहसीलदार सुरडकर साहेब, विष्णुपंत भुतेकर आणि बँक शाखाधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी श्री. कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २०१४ चे पीकविम्याचे पैसे बँकेमार्फत जमा केले जाणार असल्याचे सांगितले, तर भुतेकर यांनी हा लढा यशस्वी होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार अमोल कुंभार, बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी प्रदीप मिश्रा, विद्यमान शाखाधिकारी कुळकर्णी यांचे सहकार्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी संजय सदार, पुरुषोत्तम रंजवे, श्रीराम नागरे, डाॅ. अमर दहीहांडे, अविनाश कायंदे, ओमकार जाधव, आत्माराम गोरे, विलास जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर ठाकूर यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...