agriculture news in marathi, Farmers to get documents in Washim APMC, Maharashtra | Agrowon

वाशीम बाजार समितीतच मिळणार शेतकऱ्यांना कागदपत्रे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

वाशीम : शेतीसाठी लागणारा सातबारा उतारा, फेरफार, कोटवार बुकाची नक्कल व इतर बाबींसाठी शेतकऱ्यांना कायम पायपीट करावी लागते; मात्र आता वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कागदपत्रे उपलब्ध असणारी ‘एटीडीएम’ मशिन बसविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अडीच लाखांचा धनादेशही जमा करण्यात आला आहे. 

वाशीम : शेतीसाठी लागणारा सातबारा उतारा, फेरफार, कोटवार बुकाची नक्कल व इतर बाबींसाठी शेतकऱ्यांना कायम पायपीट करावी लागते; मात्र आता वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कागदपत्रे उपलब्ध असणारी ‘एटीडीएम’ मशिन बसविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अडीच लाखांचा धनादेशही जमा करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर बाबींसाठी सातबाराचा उतारा, फेरफारची गरज पडते. आता ‘ऑनलाइन’ कागदपत्रे मिळत असल्याने शेतकऱ्यांना सेतू केंद्रासमोर तासनतास उभे राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजार समितीच्या आवारात सर्व कागदपत्रे अवघ्या ३० रुपयांत मिळणारी मशिन (एटीडीएम) बसविण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजार समितीला मशिनचे दोन लाख २० हजार रुपये व डेटा सेंटरसाठी ३० हजार रुपये, असा दोन लाख ५० हजार रुपयांचा भरणा करण्यास सांगितले होते. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे, उपसभापती सुरेश मापारी, संचालक राजू चौधरी, दामुअण्णा गोटे, रामेश्‍वर काटेकर, बाबूराव उगले, विनोद पट्टेबहादूर, हिराभाई जानीवाले, सचिव बबनराव इंगळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अडीच लाखांचा धनादेश संबंधित कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. 

बाजार समितीच्या आवारातच कागदपत्रांची सुविधा करून देणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती ठरणार आहे. येत्या आठ दिवसांत ‘एटीडिएम’ मशिन बसविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बबनराव इंगळे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...