agriculture news in marathi, Farmers get the same high-return premium chavan | Agrowon

शेतकऱ्यांना समान पीकविमा परतावा मिळावा ः चव्हाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

नांदेड ः गतवर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समान विमा परतावा मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.

नांदेड ः गतवर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समान विमा परतावा मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता. २२) दुपारी विविध विषयांच्या आढावा बैठकीमध्ये खासदार अशोक चव्हाण बोलत होते.  या वेळी आमदार अमिताताई चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार चव्हाण म्हणाले, की भोकर आणि देगलूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना समान पीकविमा मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. राष्ट्रीय पेयजल योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. पीककर्ज वाटप, सांसद आदर्शग्राम रोहिपिंपळगाव (ता. मुदखेड) आणि चांडोळा (ता. मुखेड) येथील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

आमदार आदर्श ग्राम जांभळी (ता. भोकर) येथील विकास कामांना गती देण्यात यावी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मध्ये मिळणाऱ्या निधीबाबत नागरिकांच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करावी. धनेगाव (ता. नांदेड) येथील व मुजामपेठ (ता. नांदेड) येथील मावेजाबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश खासदार चव्हाण यांनी दिले.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील विमा नुकसान भरपाईपासून अनेक तालुक्यांतील शेतकरी वंचित राहिले आहेत. धर्माबाद तालुक्यास पीकविमा परतावा नामंजूर करण्यात आला आहे. वंचित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचे पुनरवलोकन करण्यासाठी महसूल, कृषी, बॅंक अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...