agriculture news in marathi, The farmers get water from the Arbhaal Scheme | Agrowon

आरफळ योजनेचे पाणी आल्याने शेतकरी आनंदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आळसंद, जि. सांगली  ः खानापूर-तासगाव तालुक्‍यांसाठी महत्त्वाची असणारी आरफळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन आठ ते दहा दिवस झाले आहे. या दोन्ही तालुक्‍यांतील सुमारे दोन हजार एकराला या योजनचे पाणी मिळते. खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील येरळा नदीत पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आळसंद, जि. सांगली  ः खानापूर-तासगाव तालुक्‍यांसाठी महत्त्वाची असणारी आरफळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन आठ ते दहा दिवस झाले आहे. या दोन्ही तालुक्‍यांतील सुमारे दोन हजार एकराला या योजनचे पाणी मिळते. खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील येरळा नदीत पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरफळ योजना खानापूर आणि तासगाव तालुक्‍यांतील काही भागांत पोचली आहे. ताकारी, टेंभू योजना सुरू झाली; पण ही योजना लवकर सुरू केली नाही. त्यामुळे याभागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी आरफळ योजना सुरू करण्याची मागणी सातत्याने केली होती. परंतु ही योजना लहान असल्याने याकडे कोणीच लक्ष दिले नाही. या योजनेचे लाभ क्षेत्र सुमारे दोन हजार एकराहून अधिक आहे.

आरफळ योजनेच्या पाण्याने बलवडी भा. येथील येरळा नदीतून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे येरळाकाठावरील सुमारे पाचशे एकर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. चार-पाच महिन्यांपासून कोरडी पडलेली नदी पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

येरळाकाठावर मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र आहे. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली होती. परिणामी बागायत क्षेत्र पाण्याअभावी वाळू लागले होते. बलवडीसह, तांदळगाव, कमळापूर, भाळवणी, वाझर येथून वाहणाऱ्या नदीतून हे पाणी पुढील गावांना मिळणार आहे. या गावातील शेतीलाही या पाण्याचा फायदा होणार आहे. नुकतीच नदीपात्रातील झाडेझुडपे, पानगवत काढून शासनाच्या जलसंपदा विभागाने नदी स्वच्छ केली होती. त्यामुळे नदीत पाण्याचा साठा होण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून नदीत ताकारीचे पाणी सोडावे, अशी मागणी होत होती. आता पाणी आल्याने शेतीसह नदीकाठच्या विहिरी व कूपनलिकांमधील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...