agriculture news in marathi, farmers gets 23 crores on commodity loan | Agrowon

शेतमाल तारण योजनेतून २३ कोटींचे वाटप
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सोलापूर : राज्यात शेतमाल तारण योजनेमध्ये ३०७ बाजार समित्यांपैकी केवळ १२१ बाजार समित्यांनी सहभाग घेतला. या बाजार समित्यांच्या माध्यमातून तीन हजार १४४ शेतकऱ्यांचा एक लाख २१ हजार ४०३ क्विंटल माल तारण ठेवला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना २२ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

सोलापूर : राज्यात शेतमाल तारण योजनेमध्ये ३०७ बाजार समित्यांपैकी केवळ १२१ बाजार समित्यांनी सहभाग घेतला. या बाजार समित्यांच्या माध्यमातून तीन हजार १४४ शेतकऱ्यांचा एक लाख २१ हजार ४०३ क्विंटल माल तारण ठेवला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना २२ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

राज्यात पुढील वर्षापासून गावातील विकास सोसायट्यांमार्फत पणन महामंडळ शेतमाल तारण योजना राबविण्यावर भर देणार आहे. त्यासाठी ज्या सोसायट्यांना गोडाऊनची गरज आहे, त्या सोसायट्यांनी गोडाऊन बांधण्यासाठी पणन महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहनही सहकार व पणनमंत्री देशमुख यांनी केले आहे. त्यासाठी पणन महामंडळ सोसायट्यांना मदत करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नेरपिंगळा (जि. अमरावती) या गावातील विकास सोसायटीने २० हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे, जे बाजार समित्यांना शक्‍य झाले नाही, ते एका गावातील विकास सोसायटीने शक्‍य करून दाखविले आहे. गावातील विकास सोसायट्यांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. पणन विभागाने २५ डिसेंबर २०१६ पासून अटल पणन महाअभियान सुरू केले. त्यातून ८१६ विकास सोसायट्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केले, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

राज्यात ज्या शेतकऱ्यांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांबाबत बॅंकांनी तडजोडीचे धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. दीड लाखाच्या वरील रकमेवर काही प्रमाणात सूट देऊन शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करण्यासाठी व त्यांचे बॅंकेतील खाते कर्जमुक्त करण्यासाठी बॅंकांनी तडजोडीची भूमिका स्वीकारावी. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...