agriculture news in marathi, farmers getting low price for tur, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव येथे तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

तुरीचे उत्पादन आले आहे. दर हवे तसे नाहीत; परंतु किती दिवस तूर घरात ठेवणार. कारण, मजुरी व इतर बाबींसाठी खर्च लागतोच.

- गजानन पाटील,शेतकरी, केऱ्हाळे, जि.जळगाव.

जळगाव ः तुरीचे उत्पादन यायला सुरवात झाली, तरीही शासनाचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अशातच बाजार समित्यांमध्ये तुरीला फक्त ३८०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहेत. तुरीला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. सरकारच्या आडमुठेपणामुळेच धान्य उत्पादकांची लुबाडणूक सुरू असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड निम्मी घटली. कारण मागील हंगामातही तुरीला हवे तसे दर नव्हते. यंदाही मागील हंगामासारखीच स्थिती आहे. खरिपात फक्त तुरीचेच पीक बरे आले आहे. मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, पारोळा, जळगाव भागात लागवड बरी होती. सुमारे चार हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड झाली. उत्पादन हेक्‍टरी पाच क्विंटलपर्यंत आहे.

मागील आठवड्यातच तुरीची मळणी सुरू झाली. बागायती तुरीची कापणी व मळणीचे काम सुरू आहे. कमाल शेतकऱ्यांच्या हाती तुरीचे पीक आले आहे. शेतीमाल त्यांच्या घरात आला तरी अजून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. १५ जानेवारीला तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने म्हटले होते; परंतु केंद्र सुरू झाले नाही. फक्त नोंदणी सुरू आहे. त्यातही तांत्रिक अडचणी येत असून, सर्व्हर डाउन यासंबंधीचे प्रश्‍न आहेत.

तुरीला ५४५० रुपये क्विंटलचा असा बोनससहित हमीभाव शासनाने जाहीर केला आहे; परंतु जळगावसह अमळनेर, चोपडा येथील बाजार समितीत हमीभावापेक्षा कमीच दर तूर उत्पादकांना दिला जात आहे. आवक हळूहळू वाढत आहे. सध्या तुरीला कमाल ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. हमीभाव मिळत नसल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...