दादाजींच्या उपचारासाठी शेतकरी मित्र मंडळाने जपला मानवधर्म

दादाजींच्या उपचारासाठी शेतकरी मित्र मंडळाने जपला मानवधर्म
दादाजींच्या उपचारासाठी शेतकरी मित्र मंडळाने जपला मानवधर्म

नागपूर : उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे पाहून दादाजींचा मुलगा मित्रजित यांचे डोळे या वेळी पाणावले होते.  ८१ वर्षांच्या दादाजींना नुकताच अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली; दरम्यान कुटुंबीयांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने सरकारकडे पैशांची मागणी करण्यात आली; परंतु सरकारने प्रतिसाद दिला नाही. ॲॅग्रोवनमधून १४ मे रोजी या संदर्भाने वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेत अकोला येथील श्याम आपोतीकर, विनोद साखरकर, जयेश सदावर्ते यांनी मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी मित्र मंडळ, जय गजानन मित्र मंडळ, संवेदनागृप, काळूराम रुहाटिया ट्रस्ट यांच्यासह अनेक दानदात्यांनी आर्थिक मदत दिली. हे गोळा झालेले १ लाख २१ हजा रुपये मित्रजित खोब्रागडे यांच्याकडे सोपविण्यात आले. या वेळी शेतकरी मित्र मंडळाचे श्याम आपोतीकर, आशिष आपोतीकर, हेमंत पटेल, ॲड. नितीन राऊत, सुखदा चौधरी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com