agriculture news in marathi, farmers gives overwhelming response for agrowon smart award, pune, maharashtra | Agrowon

ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास राज्यभरातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, प्रस्ताव दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.

पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास राज्यभरातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, प्रस्ताव दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.

राज्यस्तरीय आठ व विभागीय पाच गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०१९ आहे. शेती क्षेत्र आस्मानी आणि सुलतानी संकटांच्या वावटळीत सापडलेले असताना अनेक शेतकरी पाय रोवून उभे आहेत. ते जिद्द, कल्पकता, प्रयोगशीलतेच्या बळावर आव्हानांवर मात करण्यासाठी धडपडत आहेत. या बहाद्दर शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. 

राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. तसेच ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. ॲग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांसाठी आहे. तसेच ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार, ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय, ॲग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. 

यंदापासून दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ॲग्रोवनने २०१९ हे जल व्यवस्थापन वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर  स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी हा पुरस्कार दिला जाईल. कमी पाण्यात उत्तम शेतीचे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार असेल. ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी हा पुरस्कारही देण्यात येणार आहे. आपल्या शेतीमध्ये शास्त्रीय प्रयोग व संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे. विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे.   

या पुरस्कारांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली त्रयस्थ निवड समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुणे येथे शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल. 

असा पाठवा प्रस्ताव

  • राज्यातील कोणीही व्यक्ती स्वतःचा किंवा परिचितांचा प्रस्ताव पाठवू शकते.   
  • प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी, २०१९ आहे.  
  • प्रस्ताव फक्त दोन पानी असावा. त्यात संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती, वेगळेपण व इतर तपशील नमूद करावेत. याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती द्यावी.  
  • प्रस्तावावर तो कोणत्या गटातील पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.  अतिरिक्त माहिती, अन्य तपशील, छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडता येईल  एका व्यक्तीला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविता येईल. अधिकचे प्रस्ताव बाद करण्यात येतील. 

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : ॲग्रोवन स्मार्ट ॲवाॅर्डस, ॲग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२ 
ई- मेल : agrowonawards@esakal.com

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...