agriculture news in marathi, farmers gives priority to onion seed production, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा बीजोत्पादनाकडे कल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन वाढले आहे. त्यासाठी आवश्‍यक बल्ब किंवा कांदा हा शासनाकडून कमी दरात मिळाला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. आपसूकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. अनेकदा चांगल्या जातींचे बल्ब मिळत नाहीत. त्याचा परिणाम बीजोत्पादनावर होतो.

- मनोहर पाटील, शेतकरी, जळगाव.

जळगाव : जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन यंदा वाढले असून, तापी व गिरणा काठालगतचे अनेक शेतकऱ्यांचा याकडे कल आहे. यातच कांदा बीजोत्पादनासाठी आवश्‍यक बल्ब (बियाण्यासाठीचा कांदा) शेतकऱ्यांना नाफेडकडून कमी दरात मिळावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
जिल्ह्यातील शेतकरी कांदा बीजोत्पादनातून एकरी साडेतीन क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ लागले आहेत. जिल्ह्यात सुमारे दीड हजार हेक्‍टरपर्यंत कांदा बीजोत्पादन वाढले आहे. तापी व गिरणा काठालगत मधमाश्‍या व वृक्षराजी बऱ्यापैकी आहे. मधमाश्‍यांसाठी व कांदा बीजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्याने उत्पादन बऱ्यापैकी येऊ लागले आहे. उत्पादनाचा टक्के हळूहळू वाढल्याने काही शेतकरी मागील तीन वर्षांपासून त्याचे उत्पादन घेत आहेत
.
काही लहान कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांशी हमीभावाने करार केले आहेत. ५०० रुपये प्रतिकिलो या दरात खरेदीचे करारही काही भागांत झाले असून, यंदा विदगाव, खापरखेडा, आवार भागात कांदा बीजोत्पादकांची संख्या वाढल्याची माहिती आहे. 
 
कांदा बीजोत्पादनासाठी पट पद्धतीने सिंचनाऐवजी ठिबकद्वारे सिंचन करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. हव्या त्या वेळी, हवे तेवढे पाणी देता येणे शक्‍य असल्याने शेतकरी ठिबक यंत्रणेकडे वळल्याची माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...