agriculture news in marathi, farmers gives response for field visit, akola, maharashtra | Agrowon

‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून (ता. २०) शिवार फेरी सुरू झाली आहे. या शिवार फेरीत पहिल्याच दिवशी (शनिवारी) दीड हजारांवर शेतकरी सहभागी झाले. दुसऱ्या दिवशीही (रविवारी) शिवार फेरीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. सेंद्रिय शेती, यंत्रे, कापूस, तेलबिया, ज्वारी, संत्रा-लिंबू संशोधनाच्या प्रक्षेत्रावर प्रामुख्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून (ता. २०) शिवार फेरी सुरू झाली आहे. या शिवार फेरीत पहिल्याच दिवशी (शनिवारी) दीड हजारांवर शेतकरी सहभागी झाले. दुसऱ्या दिवशीही (रविवारी) शिवार फेरीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. सेंद्रिय शेती, यंत्रे, कापूस, तेलबिया, ज्वारी, संत्रा-लिंबू संशोधनाच्या प्रक्षेत्रावर प्रामुख्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

शिवार फेरीत दुसऱ्या दिवशी अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
शिवार फेरीची सुरुवात सेंद्रिय शेतीपासून होते. याठिकाणी शेतकरी तृणधान्य, भरडधान्य, देशी-पारंपरिक पिकांबद्दलची माहिती उत्सुकतेने घेत होते. सोबतच सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती, गांडूळखत प्रकल्प, विविध जिवाणू खते, मुख्यत्वे कचऱ्यापासून उपयुक्त कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरात आणणारे कचरा कुजविणारे जिवाणू वापराचे प्रात्यक्षिक आदींबाबत शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

याठिकाणी संशोधन केंद्राचे डाॅ. अादिनाथ पसलावार, डाॅ. विनोद खडसे, परिक्षित शिंगरूप, भारत फरकाडे, अमोल हरणे, अनंता परिहार, आरती गभणे, नेहा काळे, दुर्गा तायडे, अदिती देशमुख, प्रतिक्षा झिमटे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यांत्रिकीकरण, तेलबिया संशोधन, कापूस संशोधन, ज्वारी, संत्रा-लिंबू संशोधन केंद्रांच्या प्रक्षेत्रावरसुद्धा शेतकऱ्यांनी पाहणीसाठी गर्दी केली. या वेळी आयोजित चर्चासत्रांत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

आज समारोप
शिवार फेरीचा सोमवारी (ता. २२) समारोप होत आहे. या दिवशी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...