'समृद्धी'ग्रस्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रिम प्रोजेक्‍ट’ या नावाखाली समृद्धीबाधितांच्या आयुष्यावर वरवंटा फिरविला जात आहे. स्वप्नपूर्तीच्या हट्टापायी बागायती व निर्यातक्षम पीक उत्पादित जमिनींची नासाडी थांबवा. सोळा महिन्यांपासून आक्रोश करत असूनही एकदा तरी घटनास्थळाची पाहणी करा, या मागणीसाठी सोमवारी (ता. २७)  समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भाजीच्या टोपल्या भेट दिल्या.

यावेळी दुपारी दीड वाजता सोमनाथ वाघ (सिन्नर), भास्कर गुंजाळ (इगतपुरी) रावसाहेब हारक, समितीचे समन्वयक राजू देसले हे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेटले.

समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ व बागायती जमिनी घेतल्या जात आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांतील एकाही समृद्धीबाधित गावात मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यांतील काही गावांत एकरी दहा लाखांची पिके घेतली जातात. अशा गावांतील जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत.

नाशिक जिल्ह्यात वन विभागाच्या जागेतून रस्ता नेणे शक्‍य असूनही शासन प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महामार्गात सोन्यासारख्या जमिनी जात असल्याने एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गावात प्रत्यक्ष भेट द्यावी, अशी मागणी करत समृद्धीत जाणाऱ्या बागायती जमिनीत पिकलेल्या पिकांची टोपली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाऱ्यांसाठी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com