agriculture news in Marathi, farmers got loss due to not fruiting for Papya tree, Maharashtra | Agrowon

पपईला फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

अकोला ः नांदुरा तालुक्‍यातील मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे यांनी लागवड केलेल्या पपईला फळधारणा न झाल्याने हजारोंचे नुकसान झाले. याप्रकरणी तज्ज्ञांनी तीन महिन्यांपूर्वीची शेतावर जाऊन झाडांची पाहणी केली. मात्र अद्याप त्याचा अहवाल दिला नसल्याने शेतकऱ्यांना पुढील पावले उचलण्यासाठी मारक ठरले आहे. शेतकरी या अहवालाबाबत संपर्क करीत असून त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अकोला ः नांदुरा तालुक्‍यातील मोमीनाबाद येथील सचिन काळे व सुरेश गवळे यांनी लागवड केलेल्या पपईला फळधारणा न झाल्याने हजारोंचे नुकसान झाले. याप्रकरणी तज्ज्ञांनी तीन महिन्यांपूर्वीची शेतावर जाऊन झाडांची पाहणी केली. मात्र अद्याप त्याचा अहवाल दिला नसल्याने शेतकऱ्यांना पुढील पावले उचलण्यासाठी मारक ठरले आहे. शेतकरी या अहवालाबाबत संपर्क करीत असून त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मोमीनाबात येथील सचिन काळे व सुरेश गवळे यांनी मार्च २०१७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका नर्सरीतून दोन हजार पपईची रोपे घेतली होती. या रोपांची लागवड करून व्यवस्थित व्यवस्थापन केले. लागवडीनंतर शिफारशीत खते दिली. किडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. मात्र एवढे करूनही सुमारे ५० टक्के झाडे नर जातीची निघाली. त्यांना फळधारणाच झाली नाही. यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान झाले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली. त्यांनी स्थळ पंचनामा केला असता ३८ टक्के झाडे वांझ असल्याचे नमूद केले. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे कंपनी, नर्सरीकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यांना आता प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हणणे आहे. 

मध्यतंरी तज्ज्ञांनी पाहणी केली. त्याला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. यादरम्यान पाहणीचा अहवालसुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. एकीकडे शेतकरी पारंपरिक पीकपद्धतीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे अयोग्य बियाणे पुरवून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने न्याय देण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...