agriculture news in marathi, farmers got relief due rain, Maharashtra | Agrowon

पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जलधारा बरसण्यास सुरवात झाली आहे. पाण्याच्या अभाव, उन्हाचा वाढलेला चटका यामुळे खरिपाची पिके माना टाकायला लागली आहेत. पावसाच्या हजेरीने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परभणीतून जिंतूर येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

पुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जलधारा बरसण्यास सुरवात झाली आहे. पाण्याच्या अभाव, उन्हाचा वाढलेला चटका यामुळे खरिपाची पिके माना टाकायला लागली आहेत. पावसाच्या हजेरीने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परभणीतून जिंतूर येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. विशेषत: पावसाने सर्वाधिक दडी मारलेल्या भागातच पडत असलेल्या या पावसामुळे परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका, प्रचंड उकाड्यानंतर दुपारी दाट ढग गाेळा होऊन पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी अाणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उर्वरित भागांत तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर पावसाचा जोर अधिक असल्याने थोड्यात वेळात शेतांमध्ये पाणी जमा होत आहे. 

मंगळवारी (ता. १८) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग) : मध्य महाराष्ट्र : मनमाड २०, कुऱ्हे २१, तामसवाडी ३२, चाळीसगाव ५८, हातले ३०, तळेगाव ५५, खडकी ५३, नाळेगाव ३६, सावेडी २९, कडेगाव ३८, वाळकी २१, शेवगाव २०, एरंडगाव ३२, सलाबतपूर २०, कुकाणा २५, चांदा २२, घोडेगाव २४, सोनई ३०, वडाळा २१, बारामती २६, अंथुर्णी २५, मंद्रूप २१, सांगोला २३, लवंग २४, संख ४०, माडग्याळ ४६, दिघंची ३५.
मराठवाडा : लोहगाव ३८, पैठण ३१, जातेगाव २२, चाकळआंबा १९, परळी २२, कावडगाव ४६, कासारशिर्सी १९, जळकोट ३०, आंभी २६, मुरूम ३७, लोहारा २०, माकणी २६, पेठवडज २७, गंगाखेड २८, जिंतूर ९२, बोरी २९, चारठाणा ३०. 
विदर्भ : रामतीर्थ २३, मारेगाव २७, कुंभा ३०.

इतर अॅग्रो विशेष
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...