शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार : सुभाष देशमुख
सुदर्शन सुतार
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सोलापूर  : "राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक धोरणात्मक निर्णय घेत असून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे, संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान सुरू करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी भाजीपाला विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, योग्य वजनाचा शेतमाल वाजवी दरात उपलब्ध होत आहे,'''' असे प्रतिपादन सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर  : "राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक धोरणात्मक निर्णय घेत असून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे, संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान सुरू करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी भाजीपाला विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, योग्य वजनाचा शेतमाल वाजवी दरात उपलब्ध होत आहे,'''' असे प्रतिपादन सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील पाचव्या शेतकरी आठवडे बाजारचे उद्‌घाटन कर्णिक नगर क्रीडांगण येथे राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

उदघाटन प्रसंगी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहरामधील नागरिकांचा आठवडे बाजारास मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात किमान १० शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचा कृषी पणन मंडळाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी शेतकरी आठवडे बाजाराचा लाभ घ्यावा व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.

तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, ब शेतकरी उत्पादक कंपनी यांनी आपली फळे ब भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार मंत्री देशमुख यांनी या वेळी बोलताना केले.

या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्मा प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, मनपा परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, अविनाश बोमड्याळ, श्रीनिवास रिकमल्ले, सुनील कामाठी, संतोष भोसले, सुभाष शेजवाल, नगरसेविका राधिका पोसा, प्रतिभा मुदगुल, रामेश्वरी बिरू, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आदी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेतकरी आठवडे बाजार
आजतागायत राज्यात १३० शेतकरी आठवडे बाजार सुरू असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, नाशिक याप्रमाणे बाजार विविध शहरांमध्ये सुरू आहेत. या बाजारांमधून प्रत्येक आठवड्यात १५०० मेट्रिकटन फळे आणि भाजीपाल्यांची विक्री होत असून प्रत्येक आठवड्यंची उलाढाल सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांपर्यंत जाते.

इतर बातम्या
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला '...परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...