agriculture news in Marathi, Farmers hunger strike at bank office, Maharashtra | Agrowon

बॅंक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील काळेगावथडी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ८) आमरण उपोषण सुरू केले आहे. पीककर्ज, मुद्रा कर्जवाटप, बोजा यासह इतर बॅंकेशी संबंधित मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील काळेगावथडी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ८) आमरण उपोषण सुरू केले आहे. पीककर्ज, मुद्रा कर्जवाटप, बोजा यासह इतर बॅंकेशी संबंधित मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 

पीककर्ज व मुद्रांक कर्ज वाटपाची उच्चस्तरीय बॅंकिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करून फील्डवर जावून तपासणी करावी, शाखा संगणकीकृत करण्यात याव्या, ग्राहकाला आवश्‍यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, खरीप २०१८ पीककर्ज ज्या पिकावर वितरित करण्यात आले त्या घटनास्थळाची पाहणी करण्यात यावी, ३१ जुलै २०१७ रोजी माफीस पात्र शेतकऱ्यांकडून जे व्याज वसूल करण्यात आले ते व्याज शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात यावे, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार व चौकटीत राहून बॅंकेचे काम करावे, मुद्रा लोणचा बोजा ज्या खातेदाराच्या सातबारावर टाकण्यात आला आहे तो कमी करण्यात यावा आदी मागण्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांमध्ये मोहन तौर, गोविंद तौर, संतोष तौर, गजानन तौर, संतोष तौर, नानाजी तौर यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा समावेश होता. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी बॅंकेच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. परंतु सायंकाळी ५.३० पर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नव्हता. 

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...