agriculture news in Marathi, Farmers included in farm loan waiver list after two months of certificate distribution, Maharashtra | Agrowon

प्रमाणपत्र वितरणानंतर दोन महिन्यांनी शेतकऱ्यांचा समावेश लाभार्थी यादीत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

अमरावती ः कर्जमाफी प्रमाणपत्राच्या वितरणानंतर तब्बल दोन महिन्यांनी शेतकऱ्यांचा समावेश तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्‍कम खात्यात केव्हा जमा होणार असा सवाल कर्जमाफीकडे डोळे लावून असलेल्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. 

अमरावती ः कर्जमाफी प्रमाणपत्राच्या वितरणानंतर तब्बल दोन महिन्यांनी शेतकऱ्यांचा समावेश तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्‍कम खात्यात केव्हा जमा होणार असा सवाल कर्जमाफीकडे डोळे लावून असलेल्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्‍वासन शासनाने अद्याप पूर्ण केलेले नाही. दरम्यान सहकार विभागाला वेठीस धरत प्रत्येक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यापैकी एका शेतकऱ्याचा मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा स्तरावर करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातून अशा प्रकारे समारंभपूर्वक कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळालेल्या ३३ पैकी २४ शेतकऱ्यांची नावे तब्बल दोन महिन्यानंतर तात्पुरत्या कर्जमाफीच्या यादीत आली आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्षात कर्जमाफी केव्हा मिळेल, याबाबत अद्यापही अनिश्‍चितता असल्याचे शेतकरी सांगतात. 

निकषात केले बदल
योजनेच्या निकषात आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता दीड लाखापर्यंत कर्जमाफी किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान, यापैकी एकाचाच लाभ मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदान मात्र पती-पत्नी अशा दोघांनाही दिले जाईल. २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यंत केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना २०१५-१६ या कालावधीसाठी पीककर्जाच्या २५ टक्‍के किंवा २५ हजारांपर्यंत जी रक्‍कम कमी असेल, ती शासनाकडून मिळणार आहे. ही रक्‍कम १५ हजारांपेक्षा कमी असल्यास संपूर्ण रक्‍कम शेतकऱ्यांना परत केली जाईल.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...