agriculture news in marathi, Farmers' ingnor to cotton sales centers | Agrowon

कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ
चंद्रकांत जाधव
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

जळगाव :  खानदेशात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे आठपैकी फक्त सहा कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. त्यातही फक्त मुहूर्त म्हणून कापसाची खरेदी झाली. या सहा केंद्रांमध्ये मिळून तीन क्विंटल कापूस खरेदी गुरुवारी (ता.२६) झाली. शेतकऱ्यांनी अपेक्षित दर नसल्याने या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

जळगाव :  खानदेशात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे आठपैकी फक्त सहा कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. त्यातही फक्त मुहूर्त म्हणून कापसाची खरेदी झाली. या सहा केंद्रांमध्ये मिळून तीन क्विंटल कापूस खरेदी गुरुवारी (ता.२६) झाली. शेतकऱ्यांनी अपेक्षित दर नसल्याने या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

पणन महासंघाच्या जळगाव विभागांतर्गत खानदेशात यावल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, अमळनेर, धुळे, मालेगाव, येवला हे आठ केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु यातील फक्त सहा केंद्र सुरू होऊ शकली आहेत. त्यात पारोळा, धरणगाव, अमळनेर, धुळे, मालेगाव व येवला येथील केंद्र सुरू झाले आहेत; तर यावल व मुक्ताईनगर येथील केंद्र कापूस जिनिंग व प्रेसिंगचा प्रस्ताव नसल्याने सुरू झाले नाही. या केंद्रांसाठी प्रस्ताव आले, पण ते उशिराने आले असून, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ कार्यालय घेईल, असे सांगण्यात आले.

धरणगाव येथील कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पणन महासंघाच्या अध्यक्ष उषाताई शिंदे, आमदार स्मिता वाघ, पणन संचालक संजय पवार आदी उपस्थित होते. पारोळा येथील केंद्राच्या शुभारंभाला आमदार डॉ. सतीश पाटील, तर अमळनेर येथील खरेदी केंद्राच्या शुभारंभाला भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कमी दरांमुळे प्रतिसाद नाही
खरेदी केंद्रात हवा तेवढा कापूस पहिल्या दिवशी आला नाही. सहा केंद्रांवर मिळून तीन क्विंटल कापूस आला; तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता.२७) कुठलीही आवक झाली नाही. सध्या खानदेशात कापसाचे दर ४४०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलपुढे आहेत. दुसऱ्या बाजूला पणनच्या केंद्रावर कापसाला ४३२०, ४२२० आणि ४१२०  रुपये प्रतिक्विंटल दर ग्रेडनुसार दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातही बोनस द्यावा
गुजरात सरकारने जसा कापसाला प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस दिला, तसा बोनस महाराष्ट्र सरकारनेही जाहीर करावा, अशी मागणी पणन संचालक संजय पवार यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...