agriculture news in marathi, Farmer's interest in the progress of the revolution factory | Agrowon

क्रांती कारखान्याची वाटचाल शेतकरी हिताची ः जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

कुंडल, जि. सांगली ः क्रांती कारखाना अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठरला आहे, आणि त्याची वाटचाल ही शेतकरी हिताची आहे, म्हणूनच अशा कारखान्याचा राज्य आणि देश पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी बोलत होते.

कुंडल, जि. सांगली ः क्रांती कारखाना अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठरला आहे, आणि त्याची वाटचाल ही शेतकरी हिताची आहे, म्हणूनच अशा कारखान्याचा राज्य आणि देश पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी बोलत होते.

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, ‘या कारखान्याने आजवर राज्य आणि देश पातळीवरील १४ पुरस्कार मिळविले आहेत हिच पोच पावती आहे. सुरवातीला क्रांती अग्रणी जी. डी. बापूंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. काटा पूजन नवनिर्वाचित उपाध्यक्ष आत्माराम हारुगडे उभयतांच्या हस्ते झाले.

या वेळी उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, तहसीलदार राजेंद्र पोळ, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सरपंच प्रमिला पुजारी, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सचिव वसंत लाड आणि सर्व आजी, माजी संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. तर संचालक अंकुश यादव यांनी आभार मानले.

‘कारखान्याने ठिबक सिंचन, पायलट सारख्या ऊस उत्पादन वाढीसाठीच्या योजना कार्यक्षमरीत्या अमलात आणल्याने सरासरी एकरी ऊस उत्पादन २८ मे. टनावरून ५५ मे. टनांपर्यंत गेले आहे. कारखान्यात १९ मेगावॉट निर्मिती केली जात आहे. तसेच ६० हजार प्रति दिवस क्षमतेचा आसवणी प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. गत हंगामात साखरेचे दर गडगडले असले, तरी शेतकऱ्यांची नियमाप्रमाणे सर्व देणी दिली आहेत. एफआरपीपेक्षा जादाची रक्‍कम येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करीत आहोत.’
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती कारखाना

इतर बातम्या
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...