agriculture news in marathi, The farmers of Khandesh are suffering from weight loss, fragmented electricity | Agrowon

खानदेशात भारनियमन, खंडित विजेमुळे शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

जळगाव : सध्या भारनियमन, खंडित वीज आणि रोहित्रांमधील बिघाडामुळे खानदेशातील ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी थेट पूर्ण बिल भरा अन्यथा दुरुस्तीच करणार नाही, अशी अडवणूक करीत आहेत.

जळगाव : सध्या भारनियमन, खंडित वीज आणि रोहित्रांमधील बिघाडामुळे खानदेशातील ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी थेट पूर्ण बिल भरा अन्यथा दुरुस्तीच करणार नाही, अशी अडवणूक करीत आहेत.

कंपनीकडून २४ तास वीजपुरवठा देण्याचा दावा करण्यात येत असला तरी रोज दोन ते तीन तास वीज बंद असते. सूचना न देता गावांमधील वीजपुरवठा बंद केला जातो. विचारणा केल्यास दुरुस्ती सुरू असल्याचे सांगण्यात येते. किरकोळ पाऊस झाला तरी रात्रभर वीजपुरवठा बंद करण्यात येतो. आता कडक ऊन पडत असल्याने शेतकरी कृषिपंप सुरू करीत आहेत. परंतु दिवसा फक्त चार ते पाच तास वीज मिळते. अनेक ठिकाणी रोहित्र, नादुरुस्त तारा, वाहिन्या अशी समस्या आहे.

धुळे तालुक्‍यातील कापडणे येथे कांदा, कापूस व इतर पिकांची शेती आहे. परंतु नादुरुस्त रोहित्रामुळे कृषिपंप सुरू करता येत नव्हते. शेतकऱ्यांनी ही समस्या वीज कंपनीला सांगितली. मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल भरा, असे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावले. शेवटी शेतकऱ्यांना थेट शेतात वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करावे लागले.

जळगाव तालुक्‍यातील फुपनगरी येथे रोहित्रातील बिघाडामुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी वीजपुरवठा बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थ व इतरांनी वीज कंपनीकडे संपर्क साधला. पण तीन दिवस दुरुस्तीच झाली नाही. असेच प्रकार इतर भागातही सुरू असून, वीजपुरवठा मध्येच खंडित होत असल्याने कृषिपंप जळत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, अशी माहिती मिळाली.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...