agriculture news in marathi, Farmers in Khandesh not intrasted for Crop insurance | Agrowon

पीकविमा भरण्याबाबत खानदेशात शेतकरी उदासीन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

``अनेक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सर्व्हर डाउन, बॅंकांमध्ये ऑफलाइन अर्ज भरण्यासंबंधीची टाळाटाळ यामुळे या योजनेत सहभाग घेतला नाही.``
- ॲड. प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)

``खरीप पीकविमा योजनेतून मागील हंगामात फारशी भरपाई जळगाव जिल्ह्यात मिळाली नाही. अडीच लाखांपैकी ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना मागील वर्षी भरपाई मिळाली. बॅंका चुकीच्या पद्धतीने विमा हप्ते कापण्याचे प्रकार करतात. म्हणून यंदा बिगर कर्जदारांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसते.``
- नरेंद्र पाटील, शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)

जळगाव : खानदेशात सुमारे ३१ हजार शेतकरी खरीप पीकविमा योजनेत सहभागापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे विमा हप्ते सर्व्हर डाउन, बॅंकांची टाळाटाळ यामुळे भरता आले नाहीत. ऑफलाइन कामकाज सुरू होते, परंतु शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून आली.

खानदेशातील सुमारे चार लाख कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते संबंधित बॅंकांनी कापून घेतले आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागले. मागील दोन दिवसांपासून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची सवलत दिली आहे. परंतु प्रतिसाद फारसा लाभलेला नाही. ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्र, शहरांमधील महाऑनलाइन केंद्रातही सर्व्हर डाउनची समस्या मागील आठवड्यापासून कायम आहे.

बॅंकांना कर्जदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. यामुळे बॅंकांनी किती कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते कापून ते विमा कंपनीकडे सादर केले, याची नेमकी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडे मंगळवारी (ता. ३१) उपलब्ध नव्हती.
जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६ हजार, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रतेकी सुमारे ४ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला.

जळगाव जिल्ह्यात जवळपास १४ हजार, धुळ्यात १० हजार आणि नंदुरबारात सुमारे ६ हजार बिगर शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.
कृषी विभाग सकाळपासून किती शेतकरी सहभागी झाले याची माहिती मिळविण्यात व्यस्त होता. स्वतंत्र कर्मचारी त्यासंबंधी नियुक्त केले; परंतु विमा कंपनी व बॅंकांकडून नेमकी माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...