agriculture news in marathi, farmers kharip planning, pune, maharashtra | Agrowon

यंदा भात, सोयाबीन, ऊस लागवडीवर भर देणार
संदीप नवले
सोमवार, 28 मे 2018

चार ते पाच एकरांवर शेवंतीची लागवड करणार आहे. त्याचबरोबर उसाचीही लागवड करणार आहे. सध्या उसासाठी मशागतीची कामे सुरू असून शेवंतीची लागवड येत्या आठ दिवसांत करणार आहे.
-भाऊसाहेब दोरगे, यवत, ता. दौंड, जि. पुणे.

पुणे ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पेरण्यादेखील वेळेवर झाल्या होत्या. भात पट्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट झाली होती. पूर्व पट्ट्यातील शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्‍यांत सुरवातीला पावसाने काही प्रमाणात ओढ दिली होती. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली.

आता मॉन्सून दाखल होण्यासाठी काही दिवस बाकी असल्याने खरिपाची जोरदार तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. भात पट्ट्यात अनेक ठिकाणी शेत भाजणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी नांगरटीची, तर काही ठिकाणी भात रोपवाटिका टाकण्याची कामे सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची तयारी सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत निविष्ठांचा पुरवठा मात्र संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या भात पट्ट्यात भात बियाणाचा ५० तर सोयाबीन बियाणाचा २० ते ३० टक्के पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासत असून खरेदी करताना अडचणी येत आहेत. कृषी विभागाकडून वेळेवर पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडेल अशी स्थिती आहे.   

शासनाने कर्ज माफी दिल्यामुळे जिल्ह्यात अजूनही पीककर्जाची प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यातच बॅंकेने पीककर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या असल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत. जुन्नर, आंबेगाव भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात असले तरी त्यासाठी कालावधीत पुन्हा कर्ज भरण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

जुन्नर तालुक्‍यातील बल्लाळवाडी येथील हर्षल आहेर म्हणाले, की माझ्याकडे एकूण पाच ते सहा एकर शेती आहे. पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळे मशागतीची कामे सुरू आहेत. खरिपात सोयाबीनची तीन एकरांवर, झेंडूची एक एकरावर तर टोमॅटोची दोन एकरांवर लागवड करणार आहे. पाण्यासाठी एक विहीर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. गेल्यावर्षी ‘जलयुक्त’ची कामे झाल्याने यंदा बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार आहे. पीककर्ज मंजूर झाले आहे. परंतु अद्याप पीककर्ज घेतलेले नाही.

साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगाम बऱ्यापैकी गेला होता. परंतु यंदा शेतीमालास असलेल्या कमी दरामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही,असे त्यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...