agriculture news in marathi, Farmers in Kolhapur district suffer from rain | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात संततधारेने शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018
कोल्हापूर  : जिल्ह्यात पावसाची संततधार मंगळवारी (ता. २८) दुपारपर्यंत सुरूच राहिली. गगनबावड्यात सर्वाधिक ७१ मि.मि पाऊस झाला. दोन दिवसांपासून पुन्हा पावसास सुरवात झाल्यापासून अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या पश्‍चिम भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ३२०.८१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरी २६.७३ टक्के पाऊस झाला आहे.
कोल्हापूर  : जिल्ह्यात पावसाची संततधार मंगळवारी (ता. २८) दुपारपर्यंत सुरूच राहिली. गगनबावड्यात सर्वाधिक ७१ मि.मि पाऊस झाला. दोन दिवसांपासून पुन्हा पावसास सुरवात झाल्यापासून अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या पश्‍चिम भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ३२०.८१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरी २६.७३ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान राधानगरी धरणाचे उघडलेले दरवाजे मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होते. यामुळे नद्यांचे पाणी तातडीने कमी होण्याची शक्‍यता कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने बहुतांशी धरणांचे पाणी सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी विभागाने काही धरणांतील विसर्ग घटविला होता. परंतु, पुन्हा पावसाने सुरवात केल्याने धरणांतून पाणी सोडण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.
 
जिल्ह्यातील नद्यांवरील पाण्याखालील २८ बंधारे
पंचगंगा  -  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती -   हळदी, राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे
वारणा  -  चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी
दूधगंगा  -  सुळंबी, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे, तुरंबे
कासारी -   यवलूज
वेदगंगा  -  निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे, चिखली
तालुकानिहाय पाऊस 
 हातकणंगले १२.२५, शिरोळ १७.१४, पन्हाळा १२.५७, शाहुवाडी २३.५०, राधानगरी २६.६७, करवीर १०.९१, कागल २५.८६, गडहिंग्लज १७.८६, भुदरगड ३२.८०, आजरा ३८.७५ व चंदगड ३१.०० अशी एकूण ३२०.८१ मि.मि.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...