agriculture news in Marathi, Farmers loot over commission in Bhadgaon market committee, Maharashtra | Agrowon

भडगावला अडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

मिरची, भेंडी व इतर भाजीपाला मोठ्या प्रमाणात भडगाव बाजार समितीत शेतकरी आणतात. पण कमिशनखोरीमुळे नुकसान होते. याबाबत संबंधितांनी लक्ष घालून कार्यवाही करावी. 
- रघुनाथ बळिराम पाटील, भाजीपाला उत्पादक, निंभोरा, जि. जळगाव

जळगाव ः बाजार समितीत अडत वसुली बंदचा निर्णय होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला. तरीही भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून सर्रास अडत वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडे तक्रार करूनही अडतदार जुमानत नसल्याचेही समोर आले असून, शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट यातून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

भडगाव बाजार समितीचे भाजीपाला लिलाव शहरात नगर परिषदेनजीक पहाटेपासून सुरू होतात. रोज सुमारे ३५ गावांमधील शेतकरी वांगी, मिरची, भेंडी, कोथिंबीर व इतर भाजीपाला आणतात. या बाजार समितीच्या कजगाव, नगरदेवळा येथील उपबाजारांमध्येही कमिशनखोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांकडून मिरची व इतर भाजीपाल्याच्या विक्रीपोटी १०० रुपयाला १२ रुपये कमिशन घेतले जाते. त्यापोटी शेतकऱ्याला कच्ची पावती दिली जाते. रोज हा प्रकार सुरू असून, या प्रकारातून वर्षभरात लाखो रुपयांची लूट बाजार समितीमध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

कोठली (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी बबन रामकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी (ता.८) सुमारे ८३ किलो मिरची एका अडतदारातर्फे विकली. किलोमागे २१ रुपये दर मिळाला. अडतशिवाय शेतकऱ्याला १७४३ रुपये मिळणे अपेक्षित होते, परंतु त्याला या रकमेतून संबंधित अडतदाराने १८४ रुपये अडत कापून १५६९ रुपये दिले. त्यासंबंधीची कच्ची पावती त्याच्या हातात टेकवली. 

जागेवरच परवाना रद्द करील...
भडगाव बाजार समितीत भाजीपाला उत्पादक किंवा इतर शेतकऱ्यांकडून अडत वसुली, कमिशनखोरी सुरू असेल तर दोषी व्यापारी किंवा अडतदाराचा परवाना जागेवरच रद्द केला जाईल. मला फक्त यासंबंधीची कच्ची पावती समक्ष भेटून येत्या सोमवारी (ता.११) प्राप्त व्हायला हवी. याबाबत तातडीने संबंधितांशी संपर्क साधला जाईल, असे जळगाव जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर ‘ॲग्रोवन’ला सांगितले. 

प्रतिक्रिया
मी जवळपास ८३ किलो मिरची बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) विकली. तिच्या विक्रीपोटी माझ्याकडून शेकडा १२ रुपये कमिशन अडतदार यांनी घेतले. शेतकऱ्यांनी मध्यंतरी तक्रार केली होती, परंतु  दखल घेतली नाही. 
- बबन रामकृष्ण पाटील, मिरची उत्पादक, कोठली, जि. जळगाव

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...