agriculture news in marathi, Farmers in Maharashtra crisis: Water expert Dr. Rana | Agrowon

प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात ः जलतज्ज्ञ डॉ. राणा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पलूस, जि. सांगली ः केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची गळचेपी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव नाही. पाण्याचे नियोजन नाही. तरुणांच्या हाताला काम नसल्याने प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापले आहेत, असे परखड मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पलूस येथे व्यक्त केले.

येथील क्रांती साखर कारखान्याने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. एन. देखमुख होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, शरद लाड, आमदार आनंदराव पाटील, सुभाष आर्वे मारुती चव्हाण उपस्थित होते.

पलूस, जि. सांगली ः केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची गळचेपी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव नाही. पाण्याचे नियोजन नाही. तरुणांच्या हाताला काम नसल्याने प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापले आहेत, असे परखड मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पलूस येथे व्यक्त केले.

येथील क्रांती साखर कारखान्याने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. एन. देखमुख होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, शरद लाड, आमदार आनंदराव पाटील, सुभाष आर्वे मारुती चव्हाण उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. सरकारकडून १५२ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर करून तात्पुरती मदत करणे याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होणार नाही. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजना करताना सरकार दिसत नाही. दुष्काळ निधी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्भाग्य आहे. सध्याचे सरकार पाणी वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाय योजना करत नाही. यापुढे पाण्याचे संकट असेच वाढत गेले तर पुढील काळ अतिशय वाईट येणार आहे. देशात एकीकडे उत्पादन कमी तर दुसरीकडे पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे काम करण्याची करज आहे.’

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख म्हणाले, ‘देश स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा आरक्षणासाठी तरुण आणि कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या शेतकऱ्यांच्या नसून ती बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची आहे.’

इतर बातम्या
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना...जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती,...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
गडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार :...गडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे....
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणारसोलापूर  : जिल्ह्यातील पोखरापूर तलाव आणि...
एकापेक्षा अधिक चारा छावण्यास मंजुरीसोलापूर : राज्यातील महसूल मंडळामध्ये एकच छावणी...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
नियोजन आणि देखरेख समित्या स्थापन कराऔरंगाबाद : यंदा मराठवाड्याला अभूतपूर्व जलसंकटाला...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...