agriculture news in marathi, farmers from maharashtra visits Israel | Agrowon

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून इस्रायली अाविष्काराची पाहणी
दिलीप वैद्य 
बुधवार, 9 मे 2018

लोद, इस्राईल : इस्राईल येथे हाेत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनानिमित्त अभ्यास दौऱ्यासाठी येथे आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पॉलिहाउस आणि शेडनेटला भेट देऊन पाहणी केली. तेथील शेतकऱ्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे केलेले नियोजन समजून घेतले.

लोद, इस्राईल : इस्राईल येथे हाेत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनानिमित्त अभ्यास दौऱ्यासाठी येथे आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पॉलिहाउस आणि शेडनेटला भेट देऊन पाहणी केली. तेथील शेतकऱ्याने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे केलेले नियोजन समजून घेतले.

तैल अवीवपासून सुमारे ३५ किलोमीटरवर असलेल्या लोद विमानतळापासून जवळ असलेल्या दाया आणि मोशाक गावांच्या जवळ ही सुमारे दोन हजार हेक्टर्स शेती आहे. जवळपास सर्वच शेती पॉलिहाउसमध्ये आहे. टोमॅटोच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची प्रक्रिया शेतकऱ्यांना उझी या शेतकऱ्याने समजावून सांगितली. या पॉलिहाउसचे संपूर्ण नियंत्रण संगणकामार्फत केले जाते. पाणी, खते दिले जाणाऱ्या ऑटोमेशन, तापमान नियंत्रित करण्यासाठी फोगर्स यांची माहिती घेतली. या भागातील सर्वच पॉलिहाउसच्या छतावरील पावसाचे पाणी गोळा करून ते एका शेततळ्यात गोळा केले जाते आणि शेतीसाठी त्याचा वापर होतो. 

सोमवारी (ता. ७) सायंकाळी जॉर्डन-इस्राईल सीमेजवळ खजुराची पॅकेजिंग पाहिली. जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, कृषिभूषण प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन (तांदलवाडी), विशाल अग्रवाल, सुनील पाटील (रावेर), मनोज महाजन (ऐनपूर), मनोज जवंजाळ (काटोल-नागपूर), विजय ऐमिरे (चांदूर रेल्वे-अमरावती), सचिन डोंगरे (नागपूर), शैलेश झांबड (नांदुरा, बुलडाणा), महेंद्र शाह (सातारा) या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे ९० शेतकरी ३ वेगवेगळ्या गटांतून विविध प्रकारच्या फळबागांना भेट देत आहेत.

नानदान-जैन कंपनीला भेट 
जैन इरिगेशनने २०१२ मध्ये विकत घेतलेल्या आणि सध्या १५० पेक्षा जास्त देशांत कार्यरत नानदान-जैन या कंपनीच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी दुपारी भेट दिली. या वेळी इथे दाखविलेल्या माहितीपटात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी वसंत लोटू पाटील आणि त्यांचा मुलगा सुनील पाटील यांची केळी बाग दाखविण्यात आली. या ठिकाणी शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मूळ जळगाव जिल्ह्यातील या कंपनीने इस्राईलसारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या देशात सिंचनासाठी केलेले प्रयत्न पाहून सर्वच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...