इस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर

इस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर
इस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर

तेल अवीव, इस्राईल : येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे. प्रदर्शनात सिंचनाकरिता लागणारे व्हॉल्व्ह, ऑटोमेशन सिस्टिम, फिल्टर्स यांची उपकरणे आहेत. विजेशिवाय मोबाईलवर चालणारे व्हॉल्व्ह हे प्रमुख आकर्षण होते. विविध प्रकारच्या मिरच्या, द्राक्षे, भाज्यादेखील येथे आहेत. प्रदर्शनात भारतासह चीन, इस्राईल, अमेरिका आणि युरोपसह जगभरातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीचा मोठा स्टॉल या प्रदर्शनात आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे स्वागत करीत होते.

कांचन गडकरी यांचीही भेट नागपूरच्या ॲग्रोव्हिजन ग्रुपच्या माध्यमातून ४२ जण प्रदर्शन पाहण्यासाठी आले आहेत. यात १३ महिला शेतकऱ्यांसह केंद्रीय सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, अॅग्रोव्हिजनचे कोशाध्यक्ष रमेश मानकर, गौरी चंद्रायन, साधना रक्षमवार, सहकार भारतीच्या महिला प्रमुख संध्या कुळकर्णी, अंजली राऊत, नीलिमा बावले यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com