agriculture news in Marathi, Farmers march in kolhapur regarding electricity issue, Maharashtra | Agrowon

वीजप्रश्नी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर ः शेतीपंपांचे कनेक्‍शन, प्रलंबित प्रश्‍न, शेतीसाठी सकाळी बारा तास वीज द्यावी, चुकीचे भारनियमन, वाढीव वीजबिल, घरगुती व औद्योगिक संभाव्य वीजदरवाढ, शेतीपंपांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) महावितरण कार्यालयावर धडक मारली.

कोल्हापूर ः शेतीपंपांचे कनेक्‍शन, प्रलंबित प्रश्‍न, शेतीसाठी सकाळी बारा तास वीज द्यावी, चुकीचे भारनियमन, वाढीव वीजबिल, घरगुती व औद्योगिक संभाव्य वीजदरवाढ, शेतीपंपांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) महावितरण कार्यालयावर धडक मारली.

आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, मुद्दा शेतकरी पंपांचा आमच्या हक्काचा, वीजबिल भरण्यात राज्यात आम्ही एक नंबर पण तुमच्या भोंगळ कारभाराने आमची मोडलीया कंबर, अहो सरकार, शेतकऱ्यांच्या उसावर टाकताय वीजबिल दरवाढीचा बोजा, प्रामाणिकपणे बिल भरल्याचीच देताय आम्हाला सजा, महावितरणचा दाबाय लागतोय खटका राज्य सरकारला घ्यायला लागतोय झटका, नादुरुस्त मीटर तुम्ही नाय बदलणार अन् दुप्पट-तिप्पट बिल आम्हाला लावणार हा सावकारी कारभार आता नाही चालणार, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांबरोबर औद्योगिक ग्राहकांवर वीज दरवाढ लादणाऱ्या महावितरण कंपनीचीच फ्यूज उडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चास प्रारंभ झाला. 

श्री. पाटील म्हणाले, की महावितरण व सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी व आैद्योगिक क्षेत्रातील उद्योजक रस्त्यावर आले आहेत. २१ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला महावितरणने दिला आहे. मुळात कृषी पंपांच्या संदर्भातील वीज जोडणीचे ६००० प्रस्ताव एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रलंबित आहेत. घरगुती वीजबिलामध्येही दहा-बारा टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. शासनाची फ्यूज मोर्चाच्या माध्यमातून काढण्याची वेळ आली आहे. महावितरण कंपनीने एका वर्षात तीन वेळा वीजदरात वाढ केली आहे. ही अन्यायी वीजदरवाढ २७४ टक्‍के आहे. पुढे टप्प्याटप्प्याने यात वाढ होणार असून एप्रिल २०१९ पर्यंत कृषी पंपांचा वीजदर दुप्पट, तिप्पट होणार आहे. आयोगाने लागू केलेल्या दरातील वाढीची संपूर्ण रक्‍कम कृषी पंपधारक शेतकऱ्यांना भरावी लागेल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. ही वीज दरवाढ शेतकरी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांना परवडणारी नाही. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. 

‘‘२०१४-१५ पासून कृषी पंपांना नवीन वीज कनेक्‍शन दिलेले नाही. त्यामुळे पाणी असूनही शेतीसाठी पाणी मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नवीन कृषी पंपांनाही वीज कनेक्‍शन मिळत नाही. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचा हा खेळ मांडला आहे. याच्या विरोधात भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल’’, असा इशाराही त्यांनी दिला.  

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...